महाराष्ट्रातून पावसाचा जोर ओसरला; पण ‘या’ तारखेनंतर पुन्हा एकदा राज्यात मुसळधार पाऊस बरसणार, किती दिवस पडणार ? पंजाबरावांनी दिली मोठी माहिती

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Panjabrao Dakh Latest Update : हवामान खात्याने आज अर्थातच ६ ऑक्टोबर पासून महाराष्ट्रातून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू होत असल्याचे जाहीर केले आहे. पुणे हवामान विभागाचे प्रमुख डॉक्टर अनुपम कश्यपी यांनी ही माहिती दिली आहे. कश्यपी यांनी सांगितल्याप्रमाणे पुण्यातून येत्या दोन दिवसात तर महाराष्ट्रातून आजपासून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू होणार आहे.

खरंतर यावर्षी राज्यात मान्सूनचे उशिराने आगमन झाले म्हणून जून महिन्यात महाराष्ट्रात खूपच कमी पाऊस बरसला. जुलै महिन्यात मात्र पावसाची जोरदार हजेरी लागली. जून महिन्यातील पावसाची तूट बऱ्यापैकी भरून निघाली. परंतु ऑगस्ट महिन्यात पुन्हा एकदा पावसाने मोठा खंड पाडला. यामुळे महाराष्ट्रातील बहुतांशी भागातील शेती पिके पावसाच्या कमतरतेमुळे जळून गेलीत.

दरम्यान ऑगस्ट महिन्यातील ही पावसाची तूट सप्टेंबर मध्ये झालेल्या जोरदार पावसामुळे बऱ्यापैकी भरून निघाली आहे. मात्र असे असले तरी हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार सप्टेंबर महिन्यापर्यंत महाराष्ट्रात सरासरीपेक्षा 96 टक्के एवढा पाऊस झाला आहे. अर्थातच अजूनही राज्यात सरासरी एवढा पाऊस झालेला नाही.

अशातच आता महाराष्ट्रातून मान्सून माघारी फिरू लागला आहे. यामुळे ज्या भागात सप्टेंबर महिन्यातही चांगला पाऊस झालेला नाही तेथील शेतकऱ्यांची चिंता कायमच आहे. खरंतर राज्यातील बहुतांशी धरणांमध्ये सप्टेंबर महिन्यात झालेल्या जोरदार पावसामुळे बऱ्यापैकी पाणी साठा तयार झाला आहे. यामुळे आगामी काळात महाराष्ट्रावर पिण्याच्या पाण्याचे संकट तयार होणार नाही असे मत व्यक्त होत आहे.

मात्र काही भागात गेल्या महिन्यात देखील चांगला पाऊस झालेला नव्हता. यामुळे त्या भागातील शेतकऱ्यांचे यामुळे मोठे नुकसान होणार आहे. अशात ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी पावसाबाबत एक मोठी माहिती दिली आहे. पंजाबरावांनी महाराष्ट्रात आता पावसाचा जोर ओसरला असल्याचे सांगितले आहे. राज्यात आता 24 ऑक्टोबर पर्यंत कुठेच मुसळधार पाऊस होणार नाही असे पंजाबरावांनी आपल्या हवामान अंदाजात नमूद केले आहे.

परंतु 25 ऑक्टोबर पासून ते पाच नोव्हेंबर पर्यंत राज्यातील बहुतांशी भागात त्यांनी जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. विशेष म्हणजे यंदा दिवाळीच्या काळातही चांगला पाऊस बरसेल असा अंदाज त्यांनी वर्तवला आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, याआधी पंजाब रावांनी नवरात्र उत्सवाच्या काळात जोरदार पाऊस बरसणार असा अंदाज व्यक्त केला होता.

मात्र या नवीन सुधारित हवामान अंदाजात पंजाबरावांनी नवरात्र उत्सव आणि विजयादशमीच्या काळात पाऊस बरसणार नाही असे स्पष्ट केले आहे. पण 25 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर दरम्यान राज्यात चांगला पाऊस बरसेल आणि दिवाळीत देखील या वर्षी चांगला पाऊस पडणार असा अंदाज व्यक्त केला आहे. यामुळे आता डख यांचा हा नवीन अंदाज खरा ठरतो का ? हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे.

Leave a Comment