Panjabrao Dakh Maharashtra Havaman Andaj : शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी समोर येत आहे. वास्तविक, राज्यात गेल्या चार ते पाच दिवसांपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. मध्यंतरी विश्रांती घेतलेल्या पावसाने जोरदार वापसी केली आहे.
यामुळे राज्यातील बहुतांशी भागातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. राज्यातील विदर्भ, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात पावसाची तीव्रता वाढली आहे. मराठवाड्यात देखील काही भागात जोरदार पाऊस पडत आहे. मात्र असे असले तरी काही जिल्ह्यात अजूनही पावसाची तीव्रता वाढलेली नाही.
काही भागात अजूनही समाधानकारक पाऊस झालेला नाही. त्यामुळे तेथील शेतकऱ्यांच्या माध्यमातून चिंता व्यक्त केली जात आहे. यावर्षी दुष्काळ पडणार, हे दुष्काळाचेच संकेत आहे अशा चर्चा आता शेतकऱ्यांमध्ये रंगत आहेत.
शिवाय आता मान्सून सुरू होऊन जवळपास पावणे दोन महिन्यांपेक्षा अधिकचा काळ उलटला असतानाही जोरदार पाऊस न झालेल्या भागात खरीप हंगामातील पेरणी केलेली पिके संकटात आली आहेत. अशातच मात्र पंजाबराव डख यांनी एक नवीन हवामान अंदाज सार्वजनिक केला आहे.
जर तुमच्याही भागात अजून पर्यंत पाऊस झालेला नसेल तर तुमच्यासाठी पंजाबरावांचा हा अंदाज अतिशय महत्त्वाचा ठरू शकतो. खरंतर पंजाबरावांनी नुकताच एक हवामान अंदाज जारी केला असून राज्यात 22 जुलै पासून ते 25 जुलै पर्यंत मोठा पाऊस पडणार असल्याचा दावा केला आहे. म्हणजेच उद्या शनिवारपासून ते 25 जुलै पर्यंत राज्यात मोठ्या पावसाची शक्यता आहे.
तसेच 30 जुलै पर्यंत राज्यात रोज एक दिवसआड पाऊस पडणार असल्याचा अंदाजही त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे. यामुळे ज्या भागात अजूनही समाधानकारक पाऊस झालेला नसेल त्या ठिकाणी या कालावधी मध्ये जोरदार पावसाची शक्यता व्यक्त केली जात आहे.
तसेच 25 जुलै नंतर राज्यात पुन्हा एकदा पावसासाठी हवामान तयार होईल आणि 28 जुलै ते एक ऑगस्ट दरम्यान राज्यात परत एकदा पाऊस पडेल असा अंदाज यावेळी जेष्ठ हवामान तज्ञ पंजाब रावांनी व्यक्त केला आहे.
ज्या भागात आत्तापर्यंत समाधानकारक पाऊस झालेला नसल्याने त्या भागात दुष्काळ पडणार अशी भीती शेतकऱ्यांमध्ये आहे, मात्र पंजाब रावांनी यावर्षी महाराष्ट्रात दुष्काळ पडणार नसून समाधानकारक मानसून होईल असे पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे.
निश्चितच हा अंदाज शेतकऱ्यांचे धाडस वाढवणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असे सांगितले जात आहे. दरम्यान पंजाबरावांचा हा अंदाज खरा ठरो आणि ज्या भागात अजूनपर्यंत चांगला पाऊस झालेला नाही त्या भागात चांगला पाऊस व्हावा अशी इच्छा शेतकऱ्यांची आहे.