Panjabrao Dakh Maharashtra Latest News : भारतीय हवामान विभागाने आजपासून पुढील चार दिवस राज्यातील काही भागात, तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. यामध्ये दक्षिण कोकणात अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस पडणार असा अंदाज आहे.
दक्षिण कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात आगामी काही तासांसाठी ऑरेंज अलर्ट देखील जारी झाला आहे. खरंतर जुलै महिन्याच्या अखेर पासून राज्यात पावसाचा जोर कमी झाला आहे. मात्र आता आगामी तीन ते चार दिवस राज्यातील काही भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
अशातच मात्र ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी देखील शेतकऱ्यांसाठी पावसाबाबत एक महत्त्वाचे अपडेट सार्वजनिक केले आहे. पंजाब रावांनी काल अर्थातच 4 ऑगस्ट 2023 रोजी ऑगस्ट महिन्यातील पावसासंदर्भात एक महत्त्वाची माहिती दिली आहे.
डख साहेबांनी सांगितल्याप्रमाणे, राज्यात आजपासून म्हणजेच पाच ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार आहे. म्हणजे पाऊस विश्रांती घेणार आहे. 5 ऑगस्ट पासून पुढील दहा दिवस अर्थातच 15 ऑगस्टपर्यंत राज्यात पावसाची उघडीप राहू शकते असा अंदाज आहे.
मात्र स्वातंत्र्य दिनापासून हवामानात बदल होण्यास सुरुवात होणार आहे. 15 ऑगस्ट पासून राज्यात पुन्हा एकदा पावसासाठी पोषक हवामान तयार होणार असा अंदाज ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाब रावांनी यावेळी व्यक्त केला आहे. विशेष म्हणजे राज्यात 18 ते 19 ऑगस्टनंतर पावसाचा जोर वाढणार असं भाकीतही त्यांनी व्यक्त केले आहे.
वास्तविक, भारतीय हवामान विभागाने ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. विशेष म्हणजे सध्या राज्यात सर्वत्र पावसाचा जोर कमी झाला असल्याने आणि फक्त ढगाळ हवामान तयार होत असल्याने हवामाना विभागाचा हा अंदाज खरा ठरेल असे वाटतं आहे.
मात्र पंजाबरावांनी 18 ते 19 ऑगस्ट नंतर पुन्हा एकदा राज्यात अतिमुसळधार पाऊस पडू शकतो असा अंदाज व्यक्त केला असल्याने आता डख यांचा हा अंदाज खरा ठरतो का? हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे.