राज्यातील शेतकऱ्यांसाठी पंजाबरावांचा तातडीचा मेसेज ! ‘या’ तारखेनंतर पुन्हा एकदा पावसाला सुरुवात होणार, वाचा सविस्तर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Panjabrao Dakh News : राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि कामाची बातमी समोर येत आहे. खरंतर, यावर्षी राज्यातील शेतकरी बांधव मोठ्या संकटात सापडले आहेत. संकटाचे कारण ठरले आहे यंदाचा मान्सूनचा लहरीपणा.

यावर्षी मान्सून काळात खूपच कमी पाऊस बरसला असल्याने शेतकऱ्यांना शेतीमधून अपेक्षित असे उत्पादन मिळणार नसल्याचे सांगितले जात आहे. खरीप हंगामातील जवळपास सर्वच पिकांच्या उत्पादनात मोठी घट येण्याची भीती व्यक्त होत आहे.

कापूस आणि सोयाबीनच्या उत्पादनात देखील अभूतपूर्व घट येईल असे मत शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे. दरम्यान मान्सून संपूर्ण देशभरातून परतला आहे. हवामान खात्याने काल अर्थातच 19 ऑक्टोबर 2023 रोजी मान्सूनने देशातून माघार घेतली असल्याचे जाहीर केले आहे.

अशातच मात्र जेष्ठ हवामान तज्ञ पंजाबराव डख यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाचा आणि तातडीचा मॅसेज समोर येत आहे. रब्बी हंगाम सुरू होण्यापूर्वीच पंजाब रावांचा एक अतिशय महत्त्वाचा हवामान अंदाज समोर येत आहे. पंजाबराव डख यांनी सांगितल्याप्रमाणे, महाराष्ट्रात आता विजयादशमी पर्यंत कुठेच पाऊस पडणार नाही.

विशेष म्हणजे विजयादशमी नंतरही थोडे दिवस राज्यातील हवामान कोरडेच राहणार आहे. परंतु 28 ऑक्टोबरनंतर पुन्हा एकदा पावसासाठी पोषक परिस्थिती तयार होईल आणि राज्यात जोरदार पाऊस होईल असा अंदाज पंजाबरावांनी वर्तवला आहे. 28 ऑक्टोबरनंतर राज्यातील हवामानात मोठा बदल होईल आणि नोव्हेंबर महिन्यात विशेषता दिवाळीच्या काळात यंदा चांगला मोठा पाऊस पडेल असा अंदाज यावेळी पंजाबरावांच्या माध्यमातून वर्तवण्यात आला आहे.

यामुळे आता दिवाळीच्या काळात महाराष्ट्रात खरंच मोठा पाऊस पडतो का ? हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे. दरम्यान, शेतकरी बांधवांना पावसाची नितांत गरज असून दिवाळीत का होईना पण जोराचा पाऊस पडावा असे मत काही शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.

Leave a Comment