Panjabrao Dakh News : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर आली आहे. ही बातमी आहे शेतकऱ्यांच्या अतिशय जिव्हाळ्याच्या विषयाबाबत म्हणजेच राज्यातील पावसासंदर्भात. खरंतर गेल्या काही दिवसांपासून राज्यात पावसाचा खंड असल्याने शेतकऱ्यांच्या नजरा आभाळाकडे लागून आहेत.
आता जोरदार पाऊस केव्हा सुरू होणार? याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली असल्याने खरीप हंगामातील सोयाबीन, कापूस, मका, तूर इत्यादी पिकांना याचा मोठा फटका बसला आहे. खरिपातील पिके अक्षरशा मरत आहेत.
पावसाअभावी खरिपातील पिकांची राख रांगोळी होत आहे. अशातच ज्येष्ठ हवामानातज्ञ पंजाब रावांनी एक महत्त्वाची माहिती दिली आहे. पंजाबरावांनी सांगितल्याप्रमाणे, ज्यावर्षी अधिक मास राहतो त्यावर्षी महाराष्ट्रात ऑगस्टनंतरच चांगल्या पावसाला सुरुवात होत असते.
यंदा देखील जुलै महिना वगळता जुन आणि ऑगस्ट महिन्यात फारसा पाऊस झालेला नाही. यामुळे पंजाबरावांनी दिलेली माहिती खरी भासू लागली आहे. दरम्यान, पंजाब रावांनी 30 ऑगस्टपर्यंत राज्यातील विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागात पावसाची शक्यता वर्तवली आहे.
मात्र या कालावधीत राज्यात सर्व दूर पाऊस पडणार नाही केवळ विदर्भात आणि मराठवाड्यातील काही भागात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे. पण ऑगस्ट महिना संपल्यानंतर पावसाचा जोर वाढणार अस त्यांनी सांगितले आहे.
पावसाचा जोर केव्हा वाढणार ?
त्यांनी सांगितल्याप्रमाणे, राज्यात पाच सप्टेंबर नंतर जोरदार पावसाला सुरवात होऊ शकते. सप्टेंबर आणि ऑक्टोबर मध्ये राज्यात चांगला पाऊस पडू शकतो असे देखील त्यांनी नमूद केले आहे. ते सांगतात की ज्या वर्षी अधिक मास राहतो म्हणजे धोंडा राहतो त्यावर्षी ऑगस्ट महिन्यापर्यंत अपेक्षित असा पाऊस पडत नाही.
मात्र ऑगस्टनंतर परिस्थिती बदलते आणि सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात धोंडा असलेल्या वर्षी चांगला पाऊस पडतो असे त्यांनी नमूद केले आहे. यावर्षी देखील धोंड्याचा महिना आला आहे.
यामुळे यंदा देखील सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात चांगल्या पावसाची शक्यता त्यांनी वर्तवली आहे. राज्यात आता पाच सप्टेंबर नंतर पावसाचा हळूहळू जोर वाढेल आणि सर्वदूर चांगला पाऊस होईल अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे.