Panjabrao Dakh News : गेल्या पंधरा ते सोळा दिवसांपासून महाराष्ट्रातून पाऊस गायब झाला आहे. यामुळे खरीप हंगामातील पिके पावसाअभावी करपण्याची भीती व्यक्त केली जात आहे. परिणामी शेतकरी चिंतेत आहेत. यंदा दुष्काळ पडणार की काय अशी भीती शेतकऱ्यांना वाटू लागली आहे.
मला राज्यातील काही भागात पावसाला सुरुवात झाली आहे पण पावसाचा जोर खूपच कमी आहे. काल राज्यातील नागपुर समवेतच संपूर्ण विदर्भात पावसाची हजेरी लागली आहे. पण मोठा पाऊस झालेला नाही.
अशातच आता ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी शेतकऱ्यांनो चिंता करू नका राज्यात आणखी अडीच महिने जोरदार पाऊस होणार असा अंदाज व्यक्त केला आहे. पंजाबरावांनी गेल्या दहा ते पंधरा दिवसांपासून खंडित असणारा पाऊस पुन्हा एकदा जोरदार बरसणार असा अंदाज व्यक्त केला आहे.
पंजाबरावांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यात आता पावसाला सुरुवात होणार आहे. सर्वप्रथम हा पाऊस विदर्भात पडणार आहे. यानंतर हा पाऊस राज्यातील उर्वरित भागात पसरणार आहे. राज्यातील पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, कोकणात आणि उत्तर महाराष्ट्रात आता पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढेल असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.
राज्यात आता 22 ऑगस्ट पर्यंत दररोज भाग बदलत पाऊस पडणार असल्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे. विशेष म्हणजे या कालावधीमध्ये अहमदनगर आणि नासिक या दोन जिल्ह्यात चांगला पाऊस होणार असल्याच त्यांनी नमूद केल आहे. खरंतर या दोन्ही जिल्ह्यात गेल्या महिन्यातही चांगला पाऊस झाला नव्हता.
पण आता या जिल्ह्यात पावसासाठी पोषक परिस्थिती तयार होत असून आगामी काही दिवसात या दोन्ही जिल्ह्यात जोरदार पाऊस होणार असा आशावाद पंजाबरावांनी व्यक्त केला आहे. विशेष म्हणजे राज्यात 25 ऑगस्ट पासून पुन्हा एकदा पावसासाठी पोषक हवामान तयार होईल आणि 5 सप्टेंबर पर्यंत जोरदार पाऊस होईल असं देखील त्यांनी यावेळी नमूद केल आहे.
एकंदरीत पंजाबरावांनी आज पासून ते 5 सप्टेंबर पर्यंत राज्यात रोज भाग बदलत पावसाची शक्यता असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून पावसाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. मात्र पंजाबरावांचा हा अंदाज खरा ठरतो का हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे.