Panjabrao Dakh News : राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची बातमी आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील काही भागात उष्णतेची लाट येत आहे. काही ठिकाणी तापमान 43 अंश सेल्सिअस पर्यंत नोंदवले गेले आहे.
राज्यातील मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही भागांमध्ये सूर्य जणू आग ओकत असल्याची परिस्थिती राज्यात पाहायला मिळतेय. अशातच मात्र राज्यात आजपासून पुढील काही दिवस अवकाळी पाऊस आणि गारपीटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
ज्येष्ठ हवामान अभ्यासक पंजाब रावांनी हा हवामान अंदाज दिला आहे. पंजाब रावांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात आजपासून अर्थातच आठ एप्रिल पासून ते 13 एप्रिल पर्यंत अवकाळी पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता आहे.
अवकाळी पावसाला पूर्व विदर्भापासून सुरुवात होईल असे त्यांनी म्हटले आहे. त्यांनी पूर्व विदर्भात सात एप्रिल पासूनच पावसाला सुरुवात होणार असे म्हटले होते. तसेच पश्चिम विदर्भात आठ एप्रिल पासून पावसाला सुरुवात होणार असा अंदाज त्यांनी यावेळी दिला आहे.
विशेष बाब अशी की, पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भ विभागात काही ठिकाणी गारपिट सुद्धा होणार अशी शक्यता आहे. मराठवाडा बाबत बोलायचं झालं तर या विभागात 9 एप्रिल पासून ते 12 एप्रिल पर्यंत अवकाळी पावसाचा अंदाज त्यांनी दिलेला आहे.
मध्य महाराष्ट्र बाबत बोलायचं झालं तर येथे देखील नऊ ते बारा एप्रिल दरम्यान अवकाळी पावसाची शक्यता आहे. दुसरीकडे कोकण आणि उत्तर महाराष्ट्रात सुद्धा पावसाची शक्यता आहे.
सध्या स्थितीला विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागांमध्ये रब्बी हंगामातील पिकांचे हार्वेस्टिंग सुरू आहे. येथील काही शेतकऱ्यांनी आपले हार्वेस्टिंग पूर्ण केलेले आहे मात्र असे असले तरी काही शेतकऱ्यांची रब्बी हंगामातील हार्वेस्टिंग बाकी आहे.
याशिवाय हळद काढणीला देखील या परिसरात वेग आलेला आहे. दुसरीकडे उत्तर महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्र मध्ये सध्या स्थितीला कांदा काढण्याची लगबग पाहायला मिळतेय. यामुळे शेतकरी बांधव आपल्या परिवारासमवेत आणि मजुरांसमवेत शेत शिवारात लगबग करत आहेत.
दरम्यान, अशा या मोक्याच्या वेळी पुन्हा एकदा राज्यात अवकाळी पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. काही ठिकाणी गारपीट होऊ शकते असे देखील पंजाबरावांनी म्हटले आहे. साहजिकच, पंजाबरावांचा हा हवामान अंदाज खरा ठरला तर शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.
यामुळे हार्वेस्टिंगसाठी तयार असलेल्या पिकांचे मोठे नुकसान होणार असे म्हटले जात आहे. परिणामी शेतकऱ्यांना अधिक सजग राहण्याचा सल्ला यावेळी देण्यात आला आहे.