तुमचे नाव मतदार यादीत आहे की नाही हे घरबसल्या कसं पाहणार ? निवडणूक आयोगाचे ‘हे’ ॲप्लीकेशन ठरणार फायद्याचे !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Voter ID Card : सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. या निमित्ताने भारतात खऱ्या अर्थाने लोकशाहीचा महा कुंभ सजला आहे. निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्यानंतर सर्वत्र राजकीय पक्ष आणि राजकीय नेते निवडणुकीसाठी जय्यत तयारी करत आहेत.

दरम्यान या निवडणुकीच्या रणधुमाळीत आज आपण मतदारांसाठी एक अतिशय महत्वाची आणि मोठी कामाची माहिती घेऊन आलो आहोत. आज आपण मतदाराचे नाव मतदान यादीत आहे की नाही ? असेल तर ते बिनचूक आहे की नाही हे कसे चेक करायचे या विषयी माहिती जाणून घेणार आहोत.

खरेतर मतदार यादीत मतदाराचे नाव आहे की नाही? हे चेक करण्यासाठी आता कोणत्या शासकीय कार्यालयात हेलपाटे मारावे लागत नाही. कारण की आता निवडणूक आयोगाने मतदार यादीत नाव चेक करण्याची सुविधा ऑनलाइन उपलब्ध करून दिली आहे.

यासाठी निवडणूक आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळाचा किंवा एप्लीकेशनचा उपयोग केला जाऊ शकतो. दरम्यान आता आपण निवडणूक आयोगाच्या कोणत्या एप्लीकेशनवर जाऊन अन वेबसाईटवर जाऊन मतदार यादीत नाव चेक केले जाऊ शकते हे जाणून घेणार आहोत.

ऑनलाईन मतदार यादीत नाव आहे की नाही हे कसे पाहायचे ?

वोटर्स हेल्पलाइन या निवडणूक आयोगाच्या एप्लीकेशन वर जाऊन तुम्ही तुमचे मतदार यादीत नाव आहे की नाही हे पाहू शकणार आहात. याशिवाय, http://electoralsearch.in/ या वेबसाइटवर देखील मतदार यादीत नाव तपासले जाऊ शकते.

या वेबसाईटवर तुम्ही दोन पद्धतीने मतदार यादीत आपले नाव चेक करू शकता. पहिली पद्धत म्हणजे सर्च बाय डिटेल्स या पर्यायावर जाऊन तिथे तुमचे तुमचे नाव, वडिलांचे नाव, वय, लिंग, राज्य, जिल्हा इत्यादी माहिती भरून तुमचा विधानसभा मतदारसंघ निवडा आता खाली दिलेला कॅप्चा कोड टाका आणि सर्च ऑप्शनवर क्लिक करा.

यानंतर तुम्हाला तुमचे नाव मतदार यादीत आहे की नाही हे समजू शकणार आहे. यामध्ये तुमचा ओळखपत्र क्रमांक व इतर सर्व प्रकारचे डिटेल तुम्हाला पाहायला मिळेल. तसेच, Search By EPIC Number या दुसऱ्या पर्यायाने देखील तुम्ही तुमचे नाव मतदार यादीत पाहू शकता.

यासाठी तुम्हाला तुमचा एपिक नंबर टाकावा लागणार आहे. याशिवाय तुमच्या मतदान कार्ड वरील बारकोड चा वापर करू नये तुम्ही तुमचे नाव मतदार यादीत आहे की नाही हे चेक करू शकता.

Leave a Comment