उन्हाळ्यात अवघ्या 10 हजाराच्या गुंतवणूकीत सुरु करा ‘हा’ व्यवसाय, अवघ्या काही महिन्यात होणार लाखोंची कमाई

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Small Business Idea : तुम्हीही नवीन व्यवसाय करण्याच्या तयारीत आहात का मग आजची बातमी तुमच्यासाठी विशेष खास ठरणार आहे. खरे तर, आजचे युग स्पर्धेचे युग आहे. येथे तुम्हाला प्रत्येक फील्डमध्ये कॉम्पिटिशन पाहायला मिळणार आहे. राजकारण, शिक्षण, नोकरी, व्यवसाय अशा विविध क्षेत्रांमध्ये कॉम्पिटिशन पाहायला मिळत आहे.

विशेष म्हणजे हे कॉम्पिटिशन दिवसेंदिवस वाढतच राहणार आहे. दरम्यान, अशा या स्पर्धेच्या युगात तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करण्याच्या तयारीत असाल तर तुम्ही हंगामी व्यवसाय देखील सुरू केला पाहिजे.

तुमचा एखादा मेन व्यवसाय असेल तर तुम्ही त्या व्यवसायासोबत काही हंगामी व्यवसाय सुरू करून चांगली अतिरिक्त कमाई या ठिकाणी करू शकणार आहात. शिवाय जर तुम्ही नोकरी करत असाल तरी देखील तुम्ही हंगामी व्यवसाय करू शकता.

दरम्यान आज आपण अशाच एका सीजनल व्यवसायाबाबत माहिती जाणून घेणार आहोत. आज आपण ज्या सीजनल व्यवसायाची माहिती पाहणार आहोत तो व्यवसाय मात्र दहा हजाराच्या गुंतवणुकीत सुरू होऊ शकणार आहे. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया अखेर हा व्यवसाय आहे तरी कोणता आणि या व्यवसायातून किती कमाई होऊ शकते.

कोणता आहे तो व्यवसाय  

आम्ही ज्या सीजनल किंवा हंगामी व्यवसायाबाबत बोलत आहोत तो व्यवसाय आहे मच्छरदाणीचा व्यवसाय. उन्हाळी हंगामात मच्छरदाणीला बाजारात मोठी मागणी असते. बाजारात वेगवेगळ्या प्रकारच्या मच्छरदाणी तुम्हाला पाहायला मिळतील. अशा परिस्थितीत जर तुम्ही मच्छरदाणी विक्रीचा व्यवसाय सुरू केला तर तुम्हाला चांगला नफा मिळू शकणार आहे.

अवघ्या दोन-तीन महिन्यातच तुम्ही यातून चांगली कमाई करू शकणार आहात. यासाठी तुम्हाला होलसेल मार्केट मधून वेगवेगळ्या प्रकारच्या आणि सध्या ट्रेंडिंगमध्ये असलेल्या मच्छरदाणी खरेदी करून आणायच्या आहेत आणि या मच्छरदाणी तुम्ही एखादे शॉप ओपन करून किंवा रस्त्याच्या किनाऱ्यावर स्टॉल लावून विक्री करू शकणार आहात.

या व्यवसायात गुंतवणूक खूपच कमी आहे आणि मिळणारा नफा हा खूप अधिक आहे. उन्हाळ्यात आणि पावसाळ्यात डास खूप चावतात. हे टाळण्यासाठी अनेकजण मच्छरदाणीचा वापर करतात. जर तुम्ही उन्हाळा आणि पावसाळ्यात हा व्यवसाय सुरू केला तर अवघ्या 7-8 महिन्यांत तुम्हाला मोठा नफा मिळू शकतो.

फक्त 10,000 रुपयात सुरु होणार व्यवसाय

मच्छरदाणीचा व्यवसाय सुरू करायचा असेल तर दुकानात बसून विकण्यापेक्षा डोअर स्टेप विक्री केल्यास तुम्हाला फायदा होणार आहे. डोअर स्टेप विक्रीसाठी तुम्हाला मोटरसायकल लागणार आहे. तुम्ही मोटरसायकलवर मच्छरदाणी ठेवून गावांमध्ये जाऊन याची विक्री करू शकता.

तुम्ही जेवढ्या गावांना भेट द्याल तेवढाच तुमचा सेल वाढणार आहे. तेव्हा तुम्ही मार्केटमध्येही छोटेसे दुकान लावून हा व्यवसाय सुरू करू शकता. सुरुवातीच्या टप्प्यात मच्छरदाणी खरेदी करण्यासाठी तुम्हाला दहा हजार रुपयांची गुंतवणूक करावी लागणार आहे. बाजारात अनेक प्रकारच्या मच्छरदाण्या उपलब्ध आहेत.

यामुळे तुम्हाला सध्या ट्रेंडिंग असलेल्या मच्छरदाणी विक्रीसाठी ठेवाव्या लागणार आहेत. या व्यवसायातून होणाऱ्या कमाई बाबत बोलायचं झालं तर या व्यवसायातून तुम्ही तिप्पट कमाई करू शकता. समजा तुम्ही शंभर रुपयाला मच्छरदाणी विकत आणली असेल तर ती मच्छरदाणी 300 रुपयांपर्यंत विकू शकता.

Leave a Comment