सप्टेंबरमध्ये किती दिवस पाऊस पडणार आणि किती दिवस पावसाची उघडीप राहणार ? पंजाब डख यांनी एका वाक्यात सांगितलं

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Panjabrao Dakh September Havaman Andaj : गेल्या दोन दिवसापासून राज्यातील विदर्भ, मराठवाडा आणि कोकणात पावसाला सुरवात झाली आहे. पण पावसाचा जोर खूपच कमी आहे. शेतकऱ्यांना मुसळधार पावसाची प्रतीक्षा आहे. अशातच भारतीय हवामान विभागाने पावसाबाबत एक महत्वाची अपडेट जारी केले आहे.

हवामान विभागाने आजपासून गुरुवारपर्यंत अर्थातच 24 ऑगस्टपर्यंत राज्यातील मध्य महाराष्ट्र, मराठवाडा अन कोकण या भागात पाऊस पडणार असा अंदाज व्यक्त केला आहे. तसेच विदर्भातील सर्व जिल्ह्यात आज तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडणार असा अंदाज आहे. मात्र उद्यापासून विदर्भात हवामान कोरडे राहणार असा अंदाज आहे.

या चालू महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात कोकण आणि विदर्भ विभागात पाऊस होणार असा अंदाज आहे. पण पावसाचा जोर हा या चालू महिन्यात वाढणार नसल्याचे सांगितले जात आहे. पावसाचा जोर सप्टेंबरच्या सुरवातीला वाढणार असा अंदाज आहे. पुढल्या महिन्यात म्हणजे सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यातच पावसाचा जोर वाढेल असे IMD ने आपल्या निवेदनात सांगितले आहे.

अशातच पंजाबराव डख यांचा देखील एक हवामान अंदाज समोर आला आहे. डख यांनी सप्टेंबर महिन्यात किती दिवस पाऊस पडणार आणि किती दिवस पावसाची उघडीप राहणार आहे याबाबत एक अतिशय महत्वाची माहिती दिली आहे. पंजाबराव यांनी दिलेल्या माहितीनुसार, येत्या सप्टेंबर महिन्यात जवळपास 15 दिवस पावसाचा खंड राहणार आहे.

1 सप्टेंबर ते 15 सप्टेंबर राज्यात पावसाचा खंड राहणार अस त्यांनी सांगितले आहे. मात्र 15 सप्टेंबरनंतर 16 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर जोरदार पाऊस पडणार अस त्यांनी सांगितले आहे.

सप्टेंबर महिन्यातही बरेच दिवस पाऊस विश्रांती घेणार असा त्यांचा अंदाज असून हा जर अंदाज खरा ठरला तर शेतकऱ्यांना मोठा फटका बसणार आहे. मात्र सप्टेंबरचा दुसरा पंधरवाडा जोरदार पावसाचा राहणार यामुळे खरीप हंगामातील पिकांना दिलासा मिळणार आहे. 

Leave a Comment