पावसाचे पुनरागमन लांबले ! आता ‘या’ तारखेनंतरच महाराष्ट्रात धो-धो पाऊस बरसणार, हवामान विभागाची मोठी माहिती 

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra Rain Alert : राज्यात गेल्या दोन दिवसांपासून काही भागात हलका पाऊस झाला आहे. रिमझिम पावसाला सुरुवात झाली यामुळे पावसाचा लवकरच जोर वाढणार अशी आशा शेतकऱ्यांना होती. मात्र विदर्भ, मराठवाडा, कोकण तसेच राजधानी मुंबई मधील काही भागात झालेल्या रिमझिम पावसानंतरही पावसाचा जोर वाढण्यासाठी पोषक परिस्थिती तयार होत नसल्याचे सांगितले जात आहे.

कमी दाबाचे क्षेत्र आणि संबंधित चक्रीय वादळाची स्थिती या पार्श्वभूमीवर राज्यात पावसाचा जोर वाढत नाहीये. विशेष बाब म्हणजे या चालू ऑगस्टच्या महिन्यात पावसाचा जोर वाढणारच नाहीये. पण  या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात कोकण आणि विदर्भात काही भागात पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. मात्र राज्यात सर्वदूर पाऊस होणार नाही असा अंदाज आहे.

महाराष्ट्रात सध्या खरीप हंगामातील पिके वाढीच्या अवस्थेत आहे. सोयाबीन आणि कपाशीचे पीक 50 ते 60 दिवसांचे झाले आहे. या परिस्थितीत पिकांना पाण्याची आवश्यकता आहे. मात्र या चालू महिन्यात पावसाचा जवळपास 16 ते 17 दिवसांचा खंड पाहता, पिके करपू लागली आहे. जमिनीला भेगा पडल्या आहेत.

आता जर मुसळधार पाऊस झाला नाही तर पिके पावसाअभावी जळून राख होण्याची शक्यता आहे. यामुळे गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांच्या नजरा आभाळाकडे आहेत. मुसळधार पाऊस केव्हा पडतो याची शेतकरी आतुरतेने वाट पाहत आहेत. अशातच भारतीय हवामान विभागाने आता मुसळधार पावसाला केव्हा सुरुवात होणार याची थेट तारीखच सांगितली आहे.

केव्हा पडणार मुसळधार पाऊस?

पुणे हवामान विभागाचे प्रमुख डॉक्टर कृष्णानंद होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज विदर्भातील सर्वच जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे. पण आज विदर्भात पावसाचा शेवटचा दिवस ठरणार आहे. कारण की विदर्भात आता काही दिवस पाऊस विश्रांती घेणार असा अंदाज आहे.

आता विदर्भात या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातच पाऊस होणार आहे. मात्र सोमवार ते गुरुवार अर्थातच 21 ऑगस्ट ते 24 ऑगस्ट दरम्यान कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा या चार दिवसात हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो. खरंतर हवामान विभागाने ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन्ही महिन्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता व्यक्त केली होती.

पण या चालू महिन्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला आहे. यामुळे ज्याप्रमाणे जून महिन्याची तुट जुलै महिन्यात जास्तीच्या पावसाने भरून निघाली त्याचप्रमाणे ऑगस्ट महिन्याची तूट सप्टेंबर महिन्यात भरून निघेल असे होसाळीकर यांनी सांगितले आहे. त्यांनी पुढे बोलताना सांगितले की, या ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात विदर्भ आणि कोकणात पावसाची शक्यता आहे मात्र पावसाचा जोर सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच वाढणार आहे.

एकंदरीत आता सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता पाहता सर्वांचे लक्ष आता आगामी महिन्याकडे लागले आहे. जर सप्टेंबर मध्ये चांगला पाऊस झाला तर खरीप हंगामातील संकटात सापडलेली पिके पुन्हा एकदा उभारी घेतील आणि शेतकऱ्यांना यादेखील वर्षी चांगली कमाई होईल.

Leave a Comment