Panjabrao Dakh : राज्यातील काही जिल्ह्यात गेल्या दोन-तीन दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे. पाऊस पुन्हा एकदा सक्रिय झाला असल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान पाहायला मिळत आहे. सध्या शेता शिवारात शेतकऱ्यांची पेरणीसाठी धावपळ पाहायला मिळत आहे.
अगदी सकाळपासूनच शेतात शेतकरी बांधव पेरणीच्या कामासाठी आपल्या परिवारासहित दाखल होत आहेत. मात्र असं असले तरी अजूनही राज्यातील बहुतांशी भागात अपेक्षित असा पाऊस पडलेला नाही.
दरम्यान आज राज्यातील पुण्यासह काही जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला असून राज्यातील पाच जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
आज राज्यातील पुणे, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी आणि पालघर या जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता असून आय एम डी ने या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तसेच ठाणे, सिंधुदुर्ग, सातारा आणि विदर्भातील गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर या जिल्ह्यातही आज पावसाची शक्यता असल्याचा अंदाज आहे.
भारतीय हवामान विभागाव्यतिरिक्त पंजाब डख यांनी देखील एक हवामान अंदाज व्यक्त केला आहे. पंजाबराव यांनी सांगितल्याप्रमाणे, राज्यात आठ जुलै पर्यंत बहुतांशी भागात पावसाचा जोर कायम राहणार आहे. तसेच काही ठिकाणी 10 जुलै पर्यंत पाऊस पडणार असा अंदाज डख यांनी व्यक्त केला आहे.
यामुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या पेरण्या 10 जुलैपर्यंत पूर्ण होतील असा आशावाद त्यांनी व्यक्त केला आहे. याशिवाय 13 जुलैपासून ते 17 जुलै पर्यंत राज्यात पुन्हा एकदा जोरदार पाऊस होणार असल्याचा अंदाज त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.
निश्चितच जून महिन्यात दोन ते तीन आठवडे पावसाचा खंड पडल्यानंतर आता पुन्हा एकदा जुलै महिन्यात पावसाला सुरुवात झाली असल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान स्पष्टपणे पाहायला मिळत आहे. खरंतर जुलै महिन्यातील पहिला आठवडा उलटला आहे.
मात्र तरीही कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्हे वगळता राज्यातील बहुतांशी भागात पावसाचे प्रमाण हे कमीच आहे. मात्र आगामी काही दिवसात पावसाचा जोर वाढेल असा अंदाज असल्याने आता आगामी काही दिवसात जोरदार पाऊस होतो का हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे.
पंजाबराव डख यांचा हवामान अंदाजाचा लेटेस्ट व्हिडिओ