Panjabrao Dakh : महाराष्ट्रात 25 नोव्हेंबर पासून अवकाळी पावसाला सुरुवात झाली आहे. 25 नोव्हेंबर ते 27 नोव्हेंबर पर्यंत राज्यातील विविध भागांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. हवामान खात्याने 25 नोव्हेंबर पासून पावसाला सुरुवात होणार असा अंदाज दिला होता आणि त्यानुसार सध्या महाराष्ट्रात पाऊस सुरू आहे.
दरम्यान हवामान विभागाने आज आणि उद्या म्हणजेच 29 नोव्हेंबर पर्यंत अवकाळी पाऊस सुरू राहणार असा अंदाज दिला आहे. दरम्यान गेल्या तीन ते चार दिवसांपासून महाराष्ट्रात सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
रब्बी हंगामातील पिकांसाठी हा पाऊस थोडा फायदेमंद ठरला आहे तर द्राक्ष, डाळिंब, केळी यांसारख्या फळ पिकांना या पावसाचा मोठा फटका बसला आहे. यामुळे काही शेतकऱ्यांचा यापासून फायदा होणार आहे तर काही शेतकऱ्यांचे हा पाऊस मोठे नुकसान करणारा ठरत आहे.
अशातच आता जेष्ठ हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी देखील पावसाबाबत एक महत्त्वाची माहिती दिली आहे. खरे तर हवामान खात्यासोबतच पंजाब रावांनी देखील महाराष्ट्रात 25 नोव्हेंबर पासून पावसाची शक्यता वर्तवली होते.
यानुसार सध्या महाराष्ट्रात अवकाळी पाऊस सुरू आहे. यामुळे हवामान विभागाचा आणि पंजाब रावांचा हवामान अंदाज यावेळी खरा ठरला असल्याचे बोलले जात आहे.
अशातच आता पंजाब रावांनी महाराष्ट्रात 2 डिसेंबर पर्यंत भाग बदलत पाऊस पडत राहणार असा अंदाज दिला आहे. पंजाब रावांनी वर्तवलेल्या आपल्या नवीन हवामान अंदाजानुसार राज्यात 28 नोव्हेंबर ते एक डिसेंबर पर्यंत विविध भागांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता आहे.
या कालावधीत राज्यातील कोल्हापूर, सोलापूर, सांगली, बार्शी, उस्मानाबाद, लातूर, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, संभाजीनगर, अहमदनगर, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर या भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे.
तर काही ठिकाणी 2 डिसेंबर पर्यंत अवकाळी पावसाची हजेरी पाहायला मिळू शकते असे देखील त्यांनी स्पष्ट केले आहे.
मात्र या कालावधीत पडणारा पाऊस हा सर्वदूर पडणार नसून काही ठिकाणी पाऊस पडेल तर काही ठिकाणी हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे.
यामुळे अवकाळी पावसाची शक्यता लक्षात घेता शेतकरी बांधवांनी आपल्या शेती पिकांची आणि पशुधनाची काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.