Petrol-Diesel Price Reduce : सध्या संपूर्ण देशभर लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी पाहायला मिळत आहे. लोकसभेच्या चौथ्या टप्प्याचे मतदान नुकतेच पूर्ण झाले असून येत्या 20 तारखेला पाचव्या टप्प्यातील मतदानाची प्रक्रिया पूर्ण होणार आहे. या लोकसभा निवडणुकीचा निकाल चार जून 2024 ला लागणार आहे. दरम्यान, निवडणुकीच्या निकालापूर्वी सर्वसामान्यांसाठी मोठी भेट मिळू शकते अशी शक्यता व्यक्त केली जाऊ लागली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होण्यापूर्वीच पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत कपात होऊ शकते. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, सरकारने देशांतर्गत उत्पादित कच्च्या तेलावरील विंडफॉल कर 8,400 रुपये प्रति टन वरून 5,700 रुपये प्रति टन केला आहे.
यापूर्वी सरकार विंडफॉल टॅक्समध्ये सातत्याने वाढ करत होते. पण, आता या करात सलग दुसऱ्यांदा कपात करण्यात आली आहे. विशेष म्हणजे एकाचं महिन्यात दोनदा कपात झाली आहे. हा कर विशेष अतिरिक्त उत्पादन शुल्क (SAED) च्या स्वरूपात आकारला जातो.
तसेच डिझेल, पेट्रोल आणि जेट इंधन किंवा ATF च्या निर्यातीवरील SAED ‘शून्य’ वर कायम ठेवण्यात आले आहे. CBIC म्हणजेच केंद्रीय अप्रत्यक्ष कर मंडळाने आपल्या एका आदेशात म्हटले आहे की नवीन दर 16 मे पासून लागू केले जात आहेत.
हेच कारण आहे की, नजीकच्या काळात पेट्रोल डिझेलच्या किमतीत कपात होऊ शकते असे म्हटले जात आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की याआधी एक मे ला देशांतर्गत उत्पादित कच्च्या तेलावरील विंडफॉल कर हा 9600 रुपयांवरून आठ हजार चारशे रुपये एवढा करण्यात आला.
दरम्यान आता 16 मे पासून हा कर 8,400 रुपयांवरून 5700 रुपयांपर्यंत कमी करण्यात आला आहे. यामुळे आगामी काळात पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी होऊ शकतात असे म्हटले जात आहे. खरे तर गेल्या काही वर्षांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किमती सातत्याने वाढत असून यामुळे सर्वसामान्यांचे बजेट बिघडत चालले आहे.
परिणामी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात झाली तर सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार, लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होण्यापूर्वीच पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात होऊ शकते.
तथापि या संदर्भात सरकारच्या माध्यमातून कोणतीच अधिकृत अपडेट समोर आलेली नाही. यामुळे निवडणुकीचा निकाल जाहीर होण्यापूर्वी खरंच पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी होतील का हे पाहण्यासारखे राहणार आहे.