Pm Kisan Sanman Nidhi Yojana : जर तुम्हीही पीएम किसान सन्मान निधी योजनेचे लाभार्थी असाल तर आजची ही बातमी तुमच्यासाठी विशेष खास राहणार आहे. जसं की आपणास ठाऊकच आहे की, पीएम किसान योजना ही वर्तमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी योजनेपैकी एक आहे.
या योजनेची सुरुवात नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीतून 2019 मध्ये करण्यात आली आहे. तेव्हापासून ही योजना अविरतपणे सुरू आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र शेतकऱ्यांना दोन हजार रुपयाचा एक हप्ता याप्रमाणे दर चार महिन्यांनी लाभ दिला जात आहे. या योजनेअंतर्गत एका वर्षात तीन हफ्त्यात 6 हजाराचा लाभ दिला जात आहे. आतापर्यंत या योजनेच्या माध्यमातून पात्र शेतकऱ्यांना 14 हप्ते मिळाले आहेत.
सध्या या योजनेसाठी पात्र असलेल्या लाभार्थ्यांकडून पंधरावा हफ्ता केव्हा वितरित होणार याबाबत विचारणा केली जात आहे. काही मीडिया रिपोर्ट्स मध्ये या योजनेचा पंधरावा हप्ता हा नोव्हेंबर ते डिसेंबर या काळात वितरित होणार असे नमूद करण्यात आले आहे. मात्र अद्याप केंद्र शासनाच्या माध्यमातून याबाबत कोणतीच माहिती देण्यात आलेली नाही.
परंतु या योजनेचा हप्ता दर चार महिन्यांनी वितरित होत असल्याने पंधरावा हप्ता नोव्हेंबर ते डिसेंबर या दरम्यान वितरित होऊ शकतो अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. अशातच मात्र या योजनेबाबत एक अतिशय धक्कादायक माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातील काही शेतकरी या योजनेपासून वंचित राहू शकतात.
पीएम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांना ‘ई-केवायसी’, बँक खाते आधार संलग्न करणे व भूमी अभिलेख नोंदी अद्ययावत करणे बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र अजूनही या योजनेच्या अनेक लाभार्थ्यांनी ही कामे पूर्ण केलेली नाहीत. दरम्यान शासनाने ई केवायसी करण्यासाठी तसेच बँक खाते आधार सोबत संलग्न करण्यासाठी 9 सप्टेंबर 2023 पर्यंत मुदत दिली आहे.
जर या मुदतीत शेतकऱ्यांनी ही कामे केली नाहीत तर त्यांना या योजनेच्या लाभापासून वंचित ठेवले जाऊ शकते. 10 सप्टेंबर पासून अशा शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेच्या लाभार्थी यादीतून वगळले जाणार आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, अकोला जिल्ह्यात २२ हजार १४० लाभार्थ्यांची ‘ई-केवायसी’ व १२ हजार ७४१ लाभार्थ्यांचे बँक खाते आधार संलग्न करणे प्रलंबित आहे.
यामुळे जर या लाभार्थ्यांनी येत्या शनिवार पर्यंत ही कामे केले नाहीत तर त्यांना या योजनेतून वगळले जाणार असे सांगितले जात आहे. निश्चितच जर तुमचीही ई-केवायसी आणि बँक खाते आधार संलग्न बाकी असेल तर तुम्हीही ही कामे लवकरात लवकर पूर्ण करणे आवश्यक आहे, अन्यथा तुम्हाला या योजनेच्या लाभापासून वंचित राहावे लागू शकते.