8 ते 14 सप्टेंबर दरम्यान कसं राहणार महाराष्ट्रातील हवामान ? कोणत्या भागात बरसणार पाऊस ? हवामान विभागाने सांगितले की…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra Rain Alert : या चालू सप्टेंबर महिन्याची सुरुवात पावसाने झाली आहे. जून ते ऑगस्ट या मान्सूनच्या तीन महिन्यांच्या काळात केवळ जुलै महिन्यात जोरदार पाऊस झाला आहे. जून आणि ऑगस्ट महिन्यात सरासरी एवढा देखील पाऊस झाला नाही. त्यामुळे सर्वत्र चिंतेचे वातावरण आहे.

सप्टेंबर महिन्याची सुरवात मात्र पावसाने झाली आहे. गेल्या चार ते पाच दिवसात राज्यातील बहुतांश भागात पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे या चालू महिन्यात ज्या भागात पावसाने हजेरी लावली आहे तेथील शेतकऱ्यांमध्ये थोडेसे समाधानाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

मात्र अजूनही राज्यात असे अनेक भाग आहेत ज्या ठिकाणी चालू सप्टेंबर महिन्यातही पाऊस झालेला नाही. यामुळे राज्यातील काही भागातील शेतकरी अजूनही चिंतेतच आहेत. दरम्यान हवामान विभागाने पावसा संदर्भात एक अतिशय महत्त्वाची माहिती दिली आहे.

भारतीय हवामान विभागाने राज्यातील काही भागात पावसाची शक्यता वर्तवली आहे. आय एम डी ने सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्रात पुढील दोन ते तीन दिवस मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. उत्तर बंगालच्या उपसागरात चक्राकार वारे तयार होत असल्याने आज हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार होण्याची शक्यता आहे.

याचा परिणाम म्हणून महाराष्ट्रात पुढील पाच ते सात दिवस पाऊस पडणार असा अंदाज आहे. बहुतांशी जिल्ह्यात पुढील सात दिवस पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने नुकताच वर्तवला आहे. खरंतर महाराष्ट्रातील शेतकरी गेल्या अनेक दिवसांपासून मोठ्या पावसाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

विशेषतः मराठवाड्यात पाणी संकट अधिक बिकट बनले आहे. जुलै महिन्यातही चांगला पाऊस झाला नसल्याने तेथील शेती पिके संकटात आली आहे. तेथील पिके पावसाअभावी करपू लागली आहेत. अशातच हवामान खात्याने मराठवाड्यात पुढील तीन दिवस पाऊस पडणार असा अंदाज व्यक्त केला आहे.

मराठवाड्यात सहा ते नऊ सप्टेंबर रोजी बहुतांशी जिल्ह्यात हलका, मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडणार हवामान विभागाने सांगितले आहे. एवढेच नाही तर मराठवाड्यात 08 सप्टेंबर ते 14 सप्टेंबर दरम्यान सरासरी एवढा पाऊस पडणार असेही हवामान विभागाने यावेळी नमूद केले आहे. याशिवाय कोकणातही आगामी दोन-तीन दिवस पाऊस पडणार असा अंदाज आहे.

Leave a Comment