राज्यातील शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! ‘या’ कृषी विद्यापीठाने विकसित केल्या कापसाच्या 3 नवीन जाती, विशेषता काय?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Cotton New Variety : महाराष्ट्रात कापूस या नगदी पिकाची मोठ्या प्रमाणात शेती होते. राज्यातील विदर्भ, मराठवाडा आणि खानदेश हे तीन विभाग कापूस उत्पादनासाठी विशेष ओळखले जातात. दरम्यान राज्यातील कपाशी उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि गोड बातमी समोर आली आहे. ती म्हणजे परभणी कृषी विद्यापीठाने राज्यातील शेतकऱ्यांसाठी कापसाचे तीन नवीन वाण विकसित केले आहेत.

नव्याने विकसित झालेले हे वाण बीटी सरळ वाण आहेत. सरळ वाण म्हणजे असे वाण ज्या वाणाचे बियाणे पुढील तीन वर्षांपर्यंत वापरता येते. शिवाय अशा वाणाची लागवड केल्यास खतांवरील खर्च देखील कमी होतो. यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च वाचतो.

यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून कापसाच्या बीटी सरळ वाणाची मागणी बाजारात मोठया प्रमाणात आहे. मात्र असे वाण बाजारात उपलब्ध होत नसल्याने शेतकरी बांधव सरळ वाणाऐवजी संकरित वाणाची लागवड करत असत. शेतकऱ्यांची हीच अडचण लक्षात घेऊन नांदेड येथील कापूस संशोधन केंद्राने बीटी कापसाचे तीन सरळ वाण विकसित केले आहेत.

एनएच १९०१ बीटी’, ‘एनएच १९०२ बीटी’ आणि ‘एनएच १९०४’ हे तीन बीटी अमेरिकन सरळ वाण विकसित करण्यात आले असून या वाणाला नुकतीच मान्यता देखील मिळाली आहे. विशेष बाब म्हणजे आत्तापर्यंत बीटी सरळ वाण तयार करण्यात आलेले नव्हते. त्यामुळे परभणी कृषी विद्यापीठे हे वाण तयार करणारे महाराष्ट्रातील पहिले विद्यापीठ ठरले आहे.

दरम्यान नव्याने विकसित झालेले हे तिन्ही वाण महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि गुजरात राज्यात लागवडीसाठी शिफारशीत करण्यात आले आहेत. यामुळे या तिन्ही राज्यातील कपाशी उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार या तिन्ही जाती येत्या हंगामापासून शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.

कपाशीच्या नव्याने विकसित झालेल्या वाणाच्या विशेषता

‘एनएच १९०१ बीटी’, ‘एनएच १९०२ बीटी’ आणि ‘एनएच १९०४’ या नव्याने विकसित झालेल्या जाती कपाशी उत्पादकांसाठी फायदेशीर राहणार आहेत. या जातींसाठी संकरित वाणांपेक्षा खूपच कमी प्रमाणात खत लागणार आहे. रसशोषक किडी, जीवाणूजन्य करपा आणि पानावरील ठिपके या रोगांकरिता हे वाण सहनशील आहे.

या वाणाचा रुईचा उतारा 35 ते 37 टक्के एवढा आहे. या वाणापासून उत्पादित होणाऱ्या कपाशीच्या धाग्याची लांबी मध्यम राहणार आहे. या या जातीचे कपाशीचे पीक मजबूत आहे. शिवाय धाग्याची मजबूती व तलमपणाही चांगला आहे. एनएच १९०१ बीटी या वाणाचा रुईचा उतारा तब्बल 37 टक्के एवढा असल्याचा दावा करण्यात आला आहे.

हे वाण सघन लागवडीसाठी उपयुक्त आहे. नव्याने विकसित झालेल्या या तिन्ही जाती राज्यातील शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरतील आणि यामुळे कापसाची उत्पादकता वाढेल असा आशावाद आता व्यक्त होत आहे.

Leave a Comment