Pm Kisan Yojana 15th Installment : आजपासून संपूर्ण देशात नवरात्र उत्सवाची धूम पाहायला मिळणार आहे. गुजरात, महाराष्ट्रसह संपूर्ण देशात नवरात्र उत्सव मोठ्या आनंदात साजरा केला जाणार आहे. याशिवाय पुढल्या महिन्यात दिवाळीचा सणही साजरा होणार आहे.
अशा या सणासुदीच्या दिवसात मात्र जगाचा पोशिंदा शेतकरी राजा संकटात असल्याचे पाहायला मिळत आहे. खरीप हंगामात पावसाच्या कमतरतेमुळे अपेक्षित असे उत्पादन शेतकऱ्यांना मिळालेले नाहीये. शिवाय उत्पादित झालेल्या मालाला देखील बाजारात चांगला भाव मिळत नाहीये.
सध्या कापूस आणि सोयाबीन अगदी कवडीमोल दरात विकला जात आहे. शेतकऱ्यांना सणासुदीच्या काळात पैशांची निकड असल्याने शेतकरी बांधव कापूस आणि सोयाबीन हार्वेस्टिंग पूर्ण झाल्यानंतर लगेचच बाजारात विक्रीसाठी नेत आहेत. मात्र बाजारात सोयाबीनला आणि कापसाला हमीभावापेक्षा कमी भाव मिळत आहे.
यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. म्हणून या अशा विपरीत परिस्थितीत शेतकरी बांधव पीएम किसान योजनेच्या 15 व्या हफ्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. खरंतर पीएम किसान योजना ही एक केंद्रीय पुरस्कृत योजना आहे. या अंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपयाचा लाभ दिला जातो.
दोन हजार रुपयाचे तीन हप्ते असे वार्षिक सहा हजार रुपये शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत मिळत आहेत. आतापर्यंत या योजनेच्या पात्र शेतकऱ्यांना 14 हप्ते मिळाले आहेत. म्हणजे ज्या शेतकऱ्याने या योजनेचा अगदी सुरुवातीपासून लाभ घेतला असेल त्या शेतकऱ्याला आतापर्यंत 28 हजार रुपयाचा लाभ मिळाला आहे.
मागील 14 वा हप्ता हा जुलै महिन्यात शेतकऱ्यांना मिळाला होता. मागील हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात 27 जुलै रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वितरित करण्यात आला होता. यामुळे आता पंधरावा हफ्ता केव्हा मिळणार असा सवाल शेतकरी उपस्थित करत आहेत.
दरम्यान हा पंधरावा हफ्ता शेतकऱ्यांना नोव्हेंबर महिन्यात दिला जाऊ शकतो असे काही मीडिया रिपोर्ट मध्ये सांगितले जात आहे. खरंतर, बारा नोव्हेंबरपासून यंदा दिवाळीला सुरुवात होणार आहे. यामुळे 12 नोव्हेंबर पूर्वीच या योजनेचा पुढील हफ्ता दिला जाऊ शकतो असे वृत्त सध्या प्रसार माध्यमांमध्ये पाहायला मिळत आहे.
पण याबाबत केंद्र शासनाकडून कोणतीच अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर देखील याबाबतचा दावा करण्यात आलेला नाही. यामुळे या योजनेचा 15वा हप्ता नोव्हेंबर महिन्यात मिळतो की नाही हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे. पण सणासुदीचा हंगाम पाहता ही शक्यता नाकारताही येत नाही.