Pm Kisan Yojana : पीएम किसान योजना 2019 मध्ये सुरू झालेली एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये दिले जातात. दोन हजाराचा एक हप्ता याप्रमाणे या पैशांचे वितरण केले जाते. दर चार महिन्यांनी एक हप्ता दिला जातो.
आतापर्यंत या योजनेच्या माध्यमातून 14 हफ्ते पात्र शेतकऱ्यांना मिळाले आहेत. याचा 14वा हफ्ता या योजनेसाठी पात्र ठरलेल्या साडेआठ कोटी शेतकऱ्यांना 27 जुलै 2023 रोजी वितरित करण्यात आला आहे. हा मागील हप्ता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वितरित करण्यात आला होता.
विशेष म्हणजे आता या योजनेचा पुढील पंधरावा हप्ता नोव्हेंबर ते डिसेंबर दरम्यान पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. अशातच मात्र या योजनेबाबत शासनाने एक मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे या योजनेच्या अनेक लाभार्थ्यांना योजनेच्या लाभापासून वंचित राहावे लागणार अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीएम किसान योजनेचे जे लाभार्थी 9 सप्टेंबर 2023 पर्यंत अर्थातच येत्या शनिवार पर्यंत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणार नाहीत तसेच बँक खाते आधार सोबत लिंक करणार नाहीत अशा लाभार्थ्यांना या योजनेपासून वंचित ठेवले जाणार आहे. शासनाने याबाबतची सूचना जारी केली आहे.
खरंतर, पीएम किसान योजनेच्या लाभासाठी केंद्र शासनाने ई-केवायसी, बँक खाते आधार संलग्न करणे आणि भूमी अभिलेख नोंदी अद्ययावत करणे या बाबी अनिवार्य केल्या आहेत. दरम्यान शासनाने आताच याबाबत एक महत्त्वाची सूचना निर्गमित केली आहे.
सदर सुचनेनुसार, आता पीएम किसान योजनेचे जे लाभार्थी शेतकरी 9 सप्टेंबर पर्यंत ई-केवायसी करणार नाहीत आणि बँक खाते आधार सोबत संलग्न करणार नाहीत त्यांचे नाव या योजनेतून वगळले जाणार आहे.
या योजनेच्या ज्या लाभार्थ्यांनी आतापर्यंत केवायसी केलेली नसेल ते लाभार्थी आपल्या मोबाईल फोनवरून ओटीपी बेस, सीएससी सेंटर वर जाऊन आणि पीएम किसान एप्लीकेशनच्या माध्यमातून ई-केवायसीची प्रक्रिया करू शकतात. तसेच बँक खाते आधार सोबत संलग्न करण्यासाठी इंडियन पोस्ट पेमेंट बँकेत खाते उघडू शकतात किंवा आधीच अस्तित्वात असलेले बँक खाते आधार सोबत संलग्न करू शकतात.