Pm Kisan Yojana : जर तुम्हीही शेतकरी असाल आणि केंद्राच्या पीएम किसान योजनेचे लाभार्थी असाल तर आजची ही बातमी फक्त तुमच्यासाठीच आहे. खरतर, पीएम किसान सन्मान निधी योजना 24 फेब्रुवारी 2019 ला सुरु करण्यात आली आहे. वर्तमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या योजनेची सुरवात केली आहे.
ही योजना पीएम मोदी यांच्या महात्वाकांक्षी योजनेपैकी एक आहे. या योजनेअन्वये पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना वार्षिक 6 हजार रुपये दिले जातात. दोन हजार रुपयाचा एक हप्ता मिळतो. दर चार महिन्यांनी हा हफ्ता दिला जातो. आतापर्यंत 13 हफ्ते पात्र शेतकऱ्यांना मिळाले आहेत.
तेरावा हफ्ता खात्यात जमा होऊन आता चार महिन्यांपेक्षा अधिकचा कालावधी झाला आहे. यामुळे शेतकरी चौदाव्या हफ्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. दरम्यान, गेल्या दोन महिन्यांपासून 14व्या हफ्त्याबाबत विविध मीडिया रिपोर्टमध्ये आणि वृत्तसंस्थेमध्ये वेगवेगळ्या चर्चा देखील पाहायला मिळत आहेत.
यामध्ये 14 वा हफ्ता जून महिन्यात मिळणार असा दावा केला जात होता. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच हा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात केंद्र शासनाकडून वर्ग केला जाईल असे सांगितले जात होते. मात्र तसे काही झाले नाही. अशातच या योजनेच्या पुढील हफ्त्याबाबत केंद्र शासनाने एक मोठी माहिती दिली आहे.
केंद्र शासनाने पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर या योजनेचा पुढील हप्ता केव्हा मिळणार याबाबत महत्त्वाची अपडेट दिली आहे. पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार, केंद्रातील मोदी सरकार या योजनेचा हप्ता 28 जुलै 2023 रोजी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हा पुढील हप्ता पात्र शेतकऱ्यांना मिळणार आहे. एकंदरीत गेल्या अनेक दिवसांपासून ज्या पीएम किसान योजनेच्या 14व्या हफ्त्याची आतुरतेने वाट पाहिली जात होती तो हप्ता आता 28 जुलैला म्हणजेच येत्या दोन आठवड्यात पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग होणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या योजनेच्या ज्या लाभार्थी शेतकऱ्यांनी ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण केलेली आहे, आधार कार्ड बँकेसोबत लिंक केलेले आहे अशाच शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. राज्यातील जवळपास 95 लाखाहून अधिक पात्र शेतकऱ्यांना या योजनेचा चौदावा हफ्ता मिळू शकतो अशी शक्यता जाणकार लोकांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान ज्या लोकांची केवायसीची प्रक्रिया राहिली असेल तसेच बँकेसोबत आधार कार्ड लिंक करणे बाकी असेल त्यांनी लवकरात लवकर ही प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी जेणेकरून त्यांना पुढील हप्ता मिळू शकेल.
तसेच ज्या शेतकऱ्यांना 13 वा हप्ता बँक खात्यासोबत आधार कार्ड लिंक नसल्याच्या कारणांनी मिळालेला नसेल आणि त्यांनी जर ही प्रक्रिया आता पूर्ण केली असेल तर त्यांना येत्या हफ्त्यासोबत गेल्या हफ्त्याची रक्कम देखील दिली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. अर्थातच अशा शेतकऱ्यांना चार हजार रुपयाची रक्कम या येत्या हप्त्यासोबत दिली जाणार आहे.