Pm Kisan Yojana : देशभरातील आठ कोटीहून अधिक शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे पीएम किसान योजनेचा पुढील हफ्ता अर्थातच 15 वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांना मिळणार आहे.
पीएम किसान सन्मान निधी योजना ही एक केंद्रीय पुरस्कृत योजना आहे. ही योजना केंद्रातील मोदी सरकारने सुरू केली आहे. या योजनेची सुरुवात 2019 मध्ये झाली. या योजनेअंतर्गत दरवर्षी शासनाकडून 6000 रुपये पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात टाकले जातात.
हे सहा हजार रुपये मात्र शेतकऱ्यांना दोन हजार रुपयाचा एक हप्ता याप्रमाणे मिळतात. म्हणजेच एका वर्षात दोन हजार रुपयाचे तीन हप्ते पात्र शेतकऱ्यांना दिले जातात. आतापर्यंत या योजनेअंतर्गत 14 हप्ते पात्र शेतकऱ्यांना मिळाले आहेत.
तसेच पंधराव्या हफ्त्यासाठी आवश्यक पूर्वतयारी देखील शासनाने पूर्ण केली आहे. यामुळे लवकरच या योजनेचा पुढील हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार असे सांगितले जात आहे.
केव्हा जमा झाला होता 14 वा हफ्ता ?
या योजनेचा 14 वा हप्ता हा 27 जुलै 2023 रोजी देशभरातील साडेआठ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थान येथे आयोजित एका कार्यक्रमात हा मागील हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात वळता केला होता. त्यावेळी पात्र शेतकऱ्यांसाठी शासनाने 17000 कोटी रुपये वितरित केले होते.
केव्हा मिळणार पंधरावा हफ्ता?
या योजनेअंतर्गत एका आर्थिक वर्षात तीनदा दोन हजार रुपयांचा हप्ता दिला जातो. या अंतर्गत पहिला हप्ता एक एप्रिल ते 31 जुलै दरम्यान, दुसरा हप्ता एक ऑगस्ट ते 30 नोव्हेंबर दरम्यान, तिसरा हप्ता एक डिसेंबर ते 31 मार्च दरम्यान वितरित केला जातो.
यानुसार या योजनेचा पंधरावा हप्ता हा आता नोव्हेंबर पर्यंत वितरित होणे आवश्यक आहे. एका मीडिया रिपोर्टनुसार, या योजनेचा पंधरावा हप्ता हा 30 सप्टेंबर पर्यंत पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाऊ शकतो.
याबाबत मात्र केंद्र शासनाने कोणतीच माहिती दिलेली नाही. पण काही मीडिया रिपोर्टमध्ये या योजनेचा पुढील हप्ता 30 सप्टेंबर पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात वळता केला जाईल असे सांगितले जात आहे.