प्रधानमंत्री मोदींच्या नावाने राज्यात सुरू झाली नवीन घरकुल योजना; ‘या’ नागरिकांना मिळणार लाभ, कोण-कोणती कागदपत्रे लागणार ? अर्ज कसा करणार ?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Pm Modi Awas Yojana : राज्यातील आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या लोकांसाठी राज्य शासनाच्या माध्यमातून विविध योजना कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. यामध्ये ज्या लोकांकडे कच्चे घर आहे किंवा घरच नाही, बेघर आहेत अशा लोकांसाठी घरकुल योजना चालवल्या जात आहेत.

राज्यातील बेघरांसाठी विविध घरकुल योजना शासनाच्या माध्यमातून राबवल्या जात आहेत. यामध्ये शबरी आवास योजना, रमाई आवास योजना, इंदिरा आवास योजना यांसारख्या विविध योजना राज्य शासनाकडून सुरू करण्यात आल्या आहेत. खरं पाहता राज्यात एससी, एसटी तसेच इतर प्रवर्गातील नागरिकांसाठी घरकुल योजना सुरू आहेत मात्र ओबीसी प्रवर्गातील नागरिकांसाठी आतापर्यंत कोणतीच योजना नव्हती.

यामुळे ओबीसी प्रवर्गातील ज्या लोकांकडे स्वतःच्या हक्काचे घर नाही अशा लोकांना घरकुल योजनेपासून वंचित राहावे लागत होते. या पार्श्वभूमीवर शासनाच्या माध्यमातून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नावाने मोदी आवास योजना सुरू करण्यात आली आहे. ही आवास योजना राज्यातील ओबीसी प्रवर्गातील नागरिकांसाठी सुरू करण्यात आली आहे.

या योजनेअंतर्गत पुढील तीन वर्षात जवळपास दहा लाख घरे संबंधित नागरिकांना बांधून दिली जाणार आहेत. अशा परिस्थितीत आज आपण या योजनेचे निकष आणि या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणकोणती कागदपत्रे पात्र व्यक्तींना सादर करावे लागतील याबाबत थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

कोणाला मिळणार लाभ?

या योजनेचा लाभ महाराष्ट्र राज्यातील ओबीसी प्रवर्गातील नागरिकांना मिळणार आहे. प्रधानमंत्री आवास योजनेप्रमाणेच ही योजना कार्यान्वित केली जाणार आहे. या योजनेच्या लाभासाठी पीएम आवास योजनेप्रमाणेच नियम राहणार आहेत. प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये जेवढे अनुदान दिले जाते तेवढेच अनुदान या योजनेअंतर्गत मिळणार आहे.

किती अर्थसहाय्य मिळणार?

राज्यातील इतर घरकुल योजनेप्रमाणेच या योजनेअंतर्गत देखील ओबीसी प्रवर्गातील नागरिकांना घरकुल बांधण्यासाठी अर्थसहाय्य दिले जाणार आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र लाभार्थ्यांना एक लाख वीस हजार रुपयांचे अर्थसहाय्य मिळणार आहे. म्हणजेच पीएम आवास योजनेअंतर्गत तेवढे अर्थसहाय्य मिळते तेवढेच अर्थसहाय्य या योजनेच्या माध्यमातून संबंधित लाभार्थ्यांना दिले जाणार आहे.

योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक पात्रता

या योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी सदर अर्जदार व्यक्ती हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा. अर्जदार ओबीसी प्रवर्गातील असावा. संबंधित अर्जदाराचे एक लाख वीस हजार रुपयांपेक्षा अधिक वार्षिक उत्पन्न नसावे. लाभार्थ्याचे पक्के घर नसावे. स्वतःची किंवा सरकारने दिलेली जागा नसावी. सर्वात महत्त्वाचे म्हणजे याआधी संबंधित लाभार्थ्यांने कोणत्याही घरकुल योजनेचा लाभ घेतलेला नसावा.

योजनेच्या लाभासाठी आवश्यक कागदपत्रे

या योजनेअंतर्गत घरकुलाच्या लाभासाठी काही कागदपत्रांची पूर्तता नागरिकांना करावी लागणार आहे. संबंधित अर्जदार व्यक्तीचे आधार कार्ड, ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, बँक खात्याचे पासबुक, पासपोर्ट साईज फोटो, मोबाईल नंबर यांसारखी महत्त्वाची कागदपत्रे लागणार आहेत.

अर्ज केव्हा सुरू होणार

या योजनेअंतर्गत अर्ज करण्यास अजून सुरुवात झालेली नाही. ही राज्य शासनाने नव्याने घोषित केलेली योजना असून याची अद्याप वेबसाईट सुरू झालेली नसल्याने अजून अर्ज प्रक्रिया सुरू झालेली नाही. या योजनेचा जीआर निघाल्यानंतर वेबसाईट सुरू होईल आणि त्यानंतर मग अर्ज भरण्यास सुरुवात होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

Leave a Comment