PNB FD News : एफडी हा भारतात गुंतवणुकीचा सर्वात सुरक्षित आणि उत्तम पर्याय समजला जातो. हेच कारण आहे की, फार पूर्वीपासून आपल्या देशात एफडी करणाऱ्यांची संख्या खूपच अधिक असल्याचे पाहायला मिळाले आहे.
दरम्यान जर तुम्ही एफडी करण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी खूपच खास राहणार आहे. विशेषता पंजाब नॅशनल बँकेत एफडी करणाऱ्यांसाठी ही बातमी अधिक महत्त्वाची ठरणार आहे.
कारण की आज आपण पंजाब नॅशनल बँकेच्या चारशे दिवसांच्या एफडी योजनेबाबत माहिती जाणून घेणार आहोत.
पंजाब नॅशनल बँकेच्या चारशे दिवसांच्या एफडीत गुंतवणूक करणाऱ्यांना किती व्याज मिळते ? जर एखाद्या गुंतवणूकदाराने या स्कीम मध्ये पाच लाखाची गुंतवणूक केली तर त्याला किती रिटर्न मिळणार हे देखील आज आपण थोडक्यात समजून घेणार आहोत.
किती व्याज मिळणार
पंजाब नॅशनल बँकेकडून आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी एफ डी वर चांगले व्याज दिले जात आहे. ही बँक चारशे दिवसांच्या कालावधीच्या एफडी करिता 7.25 टक्के या दराने व्याज ऑफर करत आहे.
विशेष म्हणजे ही बँकेची सर्वात जास्त व्याज देणारी एफडी योजना म्हणून ओळखले जाते. अर्थातच येथे गुंतवणूक केल्यास गुंतवणूकदारांना चांगला रिटर्न मिळू शकणार आहे.
पाच लाखाची गुंतवणूक केल्यास किती रिटर्न मिळणार
जर समजा एखाद्या गुंतवणूकदाराने पंजाब नॅशनल बँकेच्या चारशे दिवसांच्या एफडी योजनेत पाच लाख रुपयांची गुंतवणूक केली तर त्याला मॅच्युरिटी वर पाच लाख 39 हजार रुपयांची रक्कम मिळणार आहे.
म्हणजेच पाच लाख रुपयांची गुंतवणूक केल्यास या एफ डी योजनेतून सदर गुंतवणूकदाराला 39 हजार रुपये एवढे व्याज मिळणार आहे.
वरिष्ठ नागरिकांना मिळणार अधिकचे व्याजदर
पंजाब नॅशनल बँकेच्या या एफ डी योजनेचे सर्वात मोठे विशेषता म्हणजे या योजनेत जर ज्येष्ठ नागरिकांनी गुंतवणूक केली तर त्यांना सामान्य ग्राहकांपेक्षा 0.50% अधिकचे व्याजदर मिळणार आहे.
म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना या चारशे दिवसांच्या एफडी योजनेसाठी 7.75 टक्के एवढे व्याज दिले जाणार आहे.