Poplar Tree Farming : अलीकडे भारतात शेती व्यवसायात मोठा बदल पाहायला मिळत आहे. शेतकऱ्यांनी आता पीक पद्धतीत मोठा बदल केला असून याचा त्यांना फायदा होत आहे. आपल्या राज्यात सोयाबीन कापूस, कांदा, मका, बाजरी, ज्वारी तूर, हळद, डाळिंब, द्राक्ष, उस, सिताफळ अशा अनेक पिकांची लागवड केली जाते.
याशिवाय अलीकडे शेतकऱ्यांनी विविध झाडांची देखील शेती सुरू केली आहे. चंदन, सागवान अशा झाडांची लागवड करून शेतकऱ्यांनी चांगली कमाई केली आहे.
दरम्यान आज आपण अशाच एका झाडाची माहिती जाणून घेणार आहोत ज्याच्या लागवडीतून शेतकऱ्यांना चांगली कमाई होऊ शकणार आहे. पॉपलर या झाडाची लागवड केल्यास चांगले उत्पन्न मिळू शकणार आहे. या झाडाच्या लाकडाला बाजारात मोठी मागणी असते.
परिणामी शेतकऱ्यांनी जर याची लागवड केली तर त्यांना चांगले उत्पादन मिळणार आहे. या झाडाची लागवड जगातील अनेक देशांमध्ये केली जाते. आपल्या भारतात देखील याची मोठ्या प्रमाणात शेती होऊ लागली आहे.
उत्तर प्रदेश राज्यातील काही भागातील शेतकरी मोठ्या प्रमाणात पॉपलरची लागवड करत आहेत. पेपर, प्लायवूड, चॉप स्टिक, माचीस, बॉक्सेस बनवण्यासाठी या झाडाच्या लाकडाचा उपयोग होतो. परिणामी बाजारात याला चांगला दर मिळतो.
पॉपलर झाड लागवडीसाठी कसे हवामान पाहिजे ?
या झाडाच्या लागवडीसाठी आपल्या भारतातील हवामान अनुकूल असल्याचे आढळून आले आहे. अर्थातच देशात याची लागवड होऊ शकते. कृषी तज्ञांनी सांगितल्याप्रमाणे पाच ते 45 अंश सेल्सिअस तापमान असणाऱ्या भागात या झाडाची लागवड होऊ शकते. परंतु जिथे बर्फ पडतो तिथे याची लागवड होऊ शकत नाही.
कोणत्या जमिनीत याची लागवड केली पाहिजे
जवळपास सर्वच प्रकारच्या जमिनीत याची लागवड होऊ शकते परंतु जिथे बर्फ पडतो अशा भागातील जमिनीवर याची लागवड केली जाऊ शकत नाही. कारण की, जिथे मुबलक सूर्यप्रकाश असतो त्याच ठिकाणी ही झाडे चांगली वाढतात.
ज्या जमिनीचा पीएच सहा ते 8.5 दरम्यान असतो अशा जमिनीत याची लागवड करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. या झाडाची लागवड करताना एका झाडापासून ते दुसऱ्या झाडाचे अंतर हे बारा ते पंधरा फुटा असावे.
पॉपलर लागवडीतुन किती कमाई होणार
कृषी तज्ञ सांगतात की एक हेक्टर जमिनीत पॉपलरची अडीचशे झाडे लावली जाऊ शकतात. याचे लाकूड बाजारात 700 ते 800 रुपये प्रति क्विंटल या दरात विकले जात आहे. यामुळे जर एक हेक्टर जमिनीत या झाडांची लागवड केली तर शेतकऱ्यांना सात ते आठ लाख रुपयांची कमाई होऊ शकते.
विशेष म्हणजे या झाडांमध्ये आंतरपीक देखील घेतले जाऊ शकते. ऊस, हळद, बटाटे, टोमॅटो, कोथिंबीर अशा विविध पिकांची या झाडांमध्ये लागवड करून अतिरिक्त कमाई केली जाऊ शकते.