Property Rights Marathi : भारतात संपत्तीवरून वेगवेगळे वाद वाद पाहायला मिळतात. आपल्याला माहितीच आहे की कायद्याने मुलांना आणि मुलींना आपल्या वडिलांच्या संपत्तीत समान अधिकार दिले आहेत. भारतीय कायद्याने मुलांना आणि मुलींना समान अधिकार दिलेले आहेत.
मात्र असे असले तरी अनेक प्रकरणांमध्ये मुलीला संपत्तीमध्ये समान अधिकार प्राप्त होत नाहीत. अशावेळी मुलगी न्यायालयात आपल्या अधिकारासाठी धाव घेऊ शकते.
पण, काही प्रकरणांमध्ये मुलीच्या मृत्यूनंतर तिच्या वडिलांच्या संपत्तीत तिच्या पतीकडून आणि तिच्या अपत्याकडून हक्क सांगितला जात असतो.
त्यामुळे अनेकांच्या माध्यमातून मुलीच्या मृत्यूनंतर मयत मुलीच्या वडिलांच्या संपत्तीत तीच्या पतीला आणि मुलांना हक्क असतो का ? असा सवाल उपस्थित केला जात होता.
दरम्यान याच संदर्भात माननीय न्यायालयाने एक अतिशय महत्त्वाचा आणि मोठा निकाल दिला आहे. न्यायालयाने मुलीच्या मृत्यूनंतर मयत मुलीच्या वडिलांच्या संपत्तीत तिच्या पतीला आणि मुलांना हक्क मान्य केला आहे.
एका मालमत्तेच्या प्रकरणात माननीय न्यायालयाने असे निरीक्षण नोंदवले आहे. खरे तर, जावयाला त्याच्या सासऱ्याच्या संपत्तीवर अधिकार मिळत नाही. म्हणजे मुलींना लग्नानंतर त्यांच्या वडिलांच्या संपत्तीत अधिकार मिळतो मात्र हा त्यांचा वैयक्तिक अधिकार असतो.
तथापि जर मुलीचा मृत्यू झाला आणि मुलीला अपत्य असेल तर अशावेळी त्या अपत्याला आणि तिच्या पतीला मयत मुलीच्या वडिलांच्या संपत्तीत अधिकार मिळू शकतो.
मात्र जर मयत मुलीला अपत्य नसेल तर तिच्या पतीला तिच्या वडिलांच्या संपत्तीत कोणताच अधिकार मिळणार नाही.
यावरून हे स्पष्ट होते की जर मुलीचा मृत्यू झाला तर त्या मुलीच्या अपत्यांना आणि तिच्या पतीला तिच्या वडिलांच्या संपत्तीत अधिकार मिळतो.
अर्थातच मुलीची मुले आपल्या आईच्या वडिलांच्या संपत्तीत अधिकार सांगू शकतात. मात्र जेव्हा आईचा मृत्यू झाला असेल तेव्हाच त्यांना हा अधिकार मिळणार आहे. आई हयात असताना ती तिच्या वडिलांच्या संपत्तीत अधिकार घेऊ शकते