Pune Aurangabad Expressway : केंद्र शासनाच्या माध्यमातून देशभरातील विविध शहरांना परस्परांना जोडण्यासाठी महामार्गांचे जाळे विकसित केले जात आहे. यासाठी भारतमाला परियोजना राबवली जात आहे. या परियोजनेअंतर्गत देशभरात जवळपास तीन हजार किलोमीटर हुन अधिक लांबीचे महामार्ग विकसित केले जाणार आहेत.
विशेष म्हणजे या परियोजने अंतर्गत विकसित होणारे सर्व महामार्ग ग्रीनफिल्ड कॉरिडोर राहणार आहेत. यात महाराष्ट्रातीलही काही महामार्गांचा समावेश आहे. पुणे-औरंगाबाद ग्रीनफिल्ड एक्सप्रेस वे हा देखील महामार्ग याच परियोजने अंतर्गत विकसित केला जाणार आहे. हा मार्ग राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून तयार केला जाणार आहे.
पुणे हे शिक्षणाचे माहेरघर आणि राज्याची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते. पूर्वीचे औरंगाबाद आणि आत्ताचे छत्रपती संभाजी नगर हे शहर मराठवाड्यातील प्रमुख शहर आहे. मराठवाड्याचे केंद्रस्थान म्हणून या शहराला ओळखले जाते. औरंगाबादसह संपूर्ण मराठवाड्यातून पुण्यात जाणाऱ्या नागरिकांची संख्या ही खूपच अधिक आहे.
अशा परिस्थितीत या दोन शहरा दरम्यानचा प्रवास गतिमान करण्यासाठी पुणे ते औरंगाबाद दरम्यान ग्रीन फील्ड कॉरिडॉर प्रस्तावित करण्यात आला आहे. हा महामार्ग अहमदनगरमार्गे जाणार असून या मार्गाची एकूण लांबी 225 किलोमीटर एवढी राहणार असून या मार्गाची रुंदी 70 मीटर एवढी प्रस्तावित करण्यात आली आहे.
या महामार्गामुळे औरंगाबाद ते पुणे हे चार तासाचे अंतर दोन तासावर येणार आहे. यामुळे सहाजिकच प्रवाशांचा प्रवास गतिमान होण्यास मदत मिळणार आहे. हा एक प्रवेश नियंत्रित महामार्ग राहणार असून पुणे जिल्ह्यातील एकूण 44 गावांमधून हा महामार्ग प्रस्तावित करण्यात आला आहे.
भविष्यात हा प्रस्तावित करण्यात आलेला महामार्ग दिल्ली-मुंबई महामार्गाशी कनेक्ट केला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. हा महामार्ग सहा पदरी आणि प्रवेश नियंत्रित राहणार आहे. याचे काम पूर्ण झाल्यानंतर या मार्गावर 120 किलोमीटर प्रतितास या वेगाने वाहने धावणार आहेत.
सध्या स्थितीला पुणे ते औरंगाबाद हा प्रवास करण्यासाठी प्रवाशांना चार तासांचा कालावधी खर्च करावा लागत आहे. पण या मार्गाचे काम पूर्ण झाल्यानंतर हा प्रवास फक्त दोन तासात पूर्ण करता येणे शक्य होणार आहे. यामुळे मराठवाड्याच्या एकात्मिक विकासाला चालना मिळणार आहे. मराठवाड्यातील कृषी, औद्योगिक, शैक्षणिक आणि पर्यटनात्मक विकास या महामार्गाने सुनिश्चित करता येणार आहे.
कोणत्या गावातून जाणार हा मार्ग?
औरंगाबाद जिल्ह्यातील या गावातून जाणार महामार्ग
औरंगाबाद तालुका: पीरवाडी, हिरापूर, सुंदरवाडी, झाल्टा, आडगाव बी.के., चिंचोली, घारदोन,
पैठण तालुका: वरवंडी खुर्द, पारगाव, डोणगाव, बालानगर, कापूसवाडी, वडाळा, ववा, वरुडी बी.के., पाचळगाव, नारायणगाव, करंजखेडा, आखतवाडा, वाघाडी, दडेगाव जहांगीर, पाटेगाव, साईगाव, पैठण एमसी १
अहमदनगर जिल्ह्यातील या गावातून जाणार महामार्ग
श्रीगोंदा तालुका :- हिंगणी, देवदैठण (ढवळे वस्ती)
पारनेर तालुका :- पाडळी रांजणगाव, कडूस, भोयरे गांगर्डे, बाबुर्डी, रुई छत्रपती, पिपरी गवळी, रायतळे, अस्तगांव, सारोळा कासार
नगर तालुका :- बाबुर्डी घुमट, उक्कडगाव, भातोडी पारगाव, मराठवाडी, दगडवाडी
पाथर्डी तालुका :- देवराई, शिरापूर, तिसगाव, निवडुंगे, सैदापूर, प्रभू पिंपरी, सुसारे
शेवगाव :- मुर्शदपूर, हासनापूर, वारखेड, चापडगाव, प्रभू वडगाव
पुणे जिल्ह्यातील या गावातून जाणार महामार्ग
भोर तालुका– वरवे बुद्रुक, शिवरे, कासुर्डी क.भा., कासुर्डी गु. एम.एसस्सी., मौजे कांजळी
हवेली तालुका– तरडे, वळती, आळंदी महतोबाची, शिंदवणे, सोरतापवाडी, हिंगणगाव, भवरपुर आणि कोरेगाव मुल
पुरंदर तालुका– कोडीत खुर्द, वरवडी, थापेवाडी, गराडे, चांबळी, सासवड, पवारवाडी, हिवरे, दिवे, सोनोरी आणि काळेवाडी
दौंड तालुका– मिरवाडी
शिरूर तालुका– गोळेगाव, चव्हाणवाडी, देवकरवाडी, पिलनवाडी, पाटेठाण,तेलवारी, वडगाव बांडे, राहू, टाकळी व पानवली, उरळगाव, सातकरवाडी, दहिवडी, आंबडे, कोरडे, बाबूळसर खुर्द, रांजणगाव गणपती आणि कारेगाव