मुंबई ते नागपूरचा प्रवास होणार फक्त साडेतीन तासात! तयार होणार ‘हा’ नवीन रेल्वे मार्ग, स्थानकांची यादी पहा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Pune To Nagpur Railway : मुंबईला महाराष्ट्राची राज्य राजधानी आणि देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखले जाते. तसेच नागपूर ही महाराष्ट्राची उपराजधानी आहे. या दोन्ही कॅपिटल शहरांमध्ये रोजाना हजारो प्रवासी प्रवास करतात. मुंबई ते नागपूर हा प्रवास प्रामुख्याने रेल्वे मार्गाने केला जातो.

दरम्यान मुंबई ते नागपूर दरम्यान रेल्वे मार्गाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे आता मुंबई ते नागपूर हा प्रवास रेल्वे मार्गाने केवळ साडेतीन तासात पार करता येणे शक्य होणार आहे. कदाचित तुमचा यावर विश्वास बसणार नाही मात्र आता मुंबई ते नागपूर हा प्रवास केवळ साडेतीन तासात पूर्ण करता येणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार या मार्गावर आता बुलेट ट्रेन चालवली जाणार आहे. विशेष बाब म्हणजे यासाठीचा डीपीआर म्हणजेच डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट तयार झाला आहे. हा प्रकल्प अहवाल नुकताच मंत्रालयात सादर झाल्याची माहिती देखील समोर आली आहे.

फेब्रुवारी 2023 मध्ये हा प्रकल्प अहवाल रेल्वे मंत्रालयाला सादर झाल्याची माहिती सूत्रांच्या माध्यमातून समोर येत आहे. अशा परिस्थितीत आज आपण मुंबई ते नागपूर दरम्यान प्रस्तावित करण्यात आलेल्या बुलेट ट्रेन प्रकल्पाबाबतच्या काही महत्त्वाच्या बाबी थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

कसा आहे मुंबई नागपूर बुलेट ट्रेन प्रकल्प?

महाराष्ट्र राज्याची राजधानी मुंबई आणि उपराजधानी नागपूर या दोन शहरांना जोडणारा हा प्रकल्प राहणार आहे. यामुळे विदर्भाची मुंबईशी कनेक्टिव्हिटी सुधारणार आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर विदर्भवासियांना जलद गतीने राजधानीत दाखल होता येणार आहे.

यामुळे विदर्भाच्या विकासाला चालना मिळणार असा दावा केला जात आहे. या मार्गाची एकूण लांबी 766 किलोमीटर एवढी राहणार आहे. या बुलेट ट्रेन प्रकल्पअंतर्गत उपस्थित होणारा रेल्वे मार्ग समृद्धी महामार्गाशी पॅराललं म्हणजेच समांतर राहणार आहे.

या रेल्वे मार्गाचा जवळपास 68% भाग हा समृद्धी महामार्ग सोबत समांतर राहणार अशी माहिती समोर आली आहे. या प्रकल्पासाठी एक लाख 70 हजार कोटी रुपयांचा खर्च केला जाणार असून या रेल्वे मार्गावर एकूण 13 स्टेशन विकसित केली जाणार आहेत. बुलेट ट्रेन ट्रेन प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर या मार्गावर 350 किलोमीटर प्रति तास या वेगाने बुलेट ट्रेन धावण्यास सक्षम राहणार आहे.

यामुळे मुंबई ते नागपूर हा प्रवास साडेतीन तासात पूर्ण होणार आहे. या बुलेट ट्रेन रेल्वे मार्गावर नागपूर, वर्धा, खापरी, पुलगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, करंजा लाड, मालेगाव, मेहकर, शिर्डी, नाशिक, इगतपुरी, शहापूर ही महत्त्वाची स्टेशन विकसित केली जाणार आहे.

Leave a Comment