बातमी कामाची ! पीएम किसान योजनेचा पंधरावा हफ्ता तुम्हाला मिळणार की नाही? कसं चेक करणार ? पहा….

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Pm Kisan Yojana : पीएम किसान सन्मान निधी योजना ही एक केंद्र पुरस्कृत योजना आहे. या योजनेची सुरुवात 2019 मध्ये झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काही मोजक्या आणि महात्वाकांक्षी योजनेत याचा समावेश केला जातो. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपयाची मदत पुरवली जाते.

दोन हजाराचा एक हप्ता याप्रमाणे या योजनेचा लाभ दिला जातो. एका वर्षात तीन हप्ते दिले जातात. दर चार महिन्यांनी एक हप्ता मिळतो. सध्या स्थितीला या योजनेचे 14 हफ्ते पात्र शेतकऱ्यांना प्राप्त झाले आहेत. मागील हप्ता जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला होता.

27 जुलै 2023 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राजस्थान येथे आयोजित एका कार्यक्रमा दरम्यान या योजनेचा चौदावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आला आहे. आता 14 वा हफ्ता वर्ग होऊन जवळपास दीड महिन्यांचा कालावधी उलटला आहे.

येत्या अडीच ते तीन महिन्यात या योजनेचा पुढील पंधरावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग होण्याची शक्यता आहे. एका मीडिया रिपोर्ट मध्ये या योजनेचा पुढील हप्ता नोव्हेंबर किंवा डिसेंबर महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल अशी माहिती देण्यात आली आहे.

जर तुम्हीही या योजनेचे पात्र शेतकरी असाल आणि योजनेचा पुढील हप्ता मिळतो की नाही याबाबत तुमच्या मनात शंका असेल तर तुम्ही या योजनेचा पुढील हफ्ता तुम्हाला मिळणार की नाही हे चेक करू शकता. यासाठी तुम्हाला पीएम किसानच्या अधिकृत संकेतस्थळावर भेट द्यावी लागणार आहे.

15व्या हफ्त्याचा लाभ मिळणार की नाही कसे चेक करणार?

यासाठी तुम्हाला पीएम किसान योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर भेट द्यायची आहे. pmkisan.gov.in हे पीएम किसानच अधिकृत संकेतस्थळ ओपन करायचे आहे. या वेबसाईटवर तुम्हाला सर्वप्रथम लॉगिन करायचे आहे. त्यानंतर स्क्रीनवर दिसत असलेल्या बेनिफिशियरी स्टेटस या पर्यायावर क्लिक करायचे आहे.

यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला योजनेचा नोंदणी क्रमांक किंवा मग दहा अंकी मोबाईल क्रमांक टाकावा लागणार आहे. इथे एक गोष्ट लक्षात ठेवा की या योजनेला रजिस्टर असलेला मोबाईल नंबरच तुम्हाला इथे टाकावा लागणार आहे. त्यानंतर तुम्हाला स्क्रीनवर दिसत असलेला कॅपचा कोड टाकायचा आहे.

यानंतर तुम्हाला सबमिट या पर्यायावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला ई-केवायसी, पात्रता आणि लँड सिडींग असे पर्याय दिसतील. या तीन पर्यायांपुढे जर येस लिहलेले असेल तर तुम्हाला पंधरावा हफ्ता मिळेल. मात्र जर या तिन्ही पर्यायांपुढे नो असेल तर तुम्हाला या योजनेचा पुढील हप्ता मिळणार नाही.

Leave a Comment