Pune Bullet Train News : सध्या संपूर्ण देशभरात रेल्वेचे जाळे विस्तारण्याचे काम सुरू आहे. यामध्ये देशातील वेगवेगळ्या मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस सुरू केल्या जात आहेत. तसेच देशातील काही महत्त्वाच्या मार्गावर बुलेट ट्रेन सुरू करण्याचे नियोजन आहे. भारताच्या नॅशनल रेल्वे प्लॅनने बुलेट ट्रेनसाठी सात मार्ग शोधले आहेत. यामध्ये मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेन, मुंबई ते नागपूर बुलेट ट्रेन आणि मुंबई ते हैदराबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचा देखील समावेश होतो.
यापैकी मुंबई ते अहमदाबाद या बुलेट ट्रेन प्रकल्पाचे प्रत्यक्ष काम देखील सुरू झाले आहे. याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू असून या मार्गावरील काही स्टेशनचे काम पूर्ण देखील झाले आहे. तसेच मुंबई ते नागपूर दरम्यानच्या बुलेट ट्रेन प्रकल्पाचा डीपीआर म्हणजेच डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट हा रेल्वे मंत्रालयाकडे सादर झाला आहे.
रेल्वे मंत्रालय आता या प्रस्तावाचा सविस्तर अभ्यास करेल आणि त्यानंतर या प्रकल्पाला हिरवा कंदील दाखवेल आणि मग या मार्गावरील बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम प्रत्यक्षात सुरू होईल असे सांगितले जात आहे. अशातच मुंबई ते हैदराबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाबाबत एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी माहिती समोर येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, यादेखील प्रकल्पाचा डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट म्हणजे सविस्तर प्रकल्प अहवाल सादर झाला आहे. त्यामुळे आता या प्रकल्पाच्या पुढील कामाला वेग येणार आहे. या मुंबई ते हैदराबाद दरम्यानच्या बुलेट ट्रेनमुळे मुंबई आणि बेंगलोर ही दोन शहरे परस्परांना जोडली जाणार आहेत.
मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे तर बेंगलोर हे आयटी क्षेत्रासाठी विशेष ओळखले जाते. बेंगलोरला आयटी कंपन्यांच हब म्हणतात. यामुळे हा बुलेट ट्रेन प्रकल्प आर्थिक राजधानी आणि आयटी हब यांना जोडणारा राहणार आहे. विशेष बाब म्हणजे या प्रकल्पांतर्गत धावणारी बुलेट ट्रेन पुण्यातून धावणार आहे.
यामुळे या प्रकल्पाचा पुणेकरांना देखील मोठा फायदा होणार आहे. यामुळे मुंबई आणि पुणे या महाराष्ट्रातील दोन महत्त्वाच्या शहरांच्या विकासाला चालना मिळणार असून यामुळे मुंबई आणि पुण्यादरम्यानची कनेक्टिव्हिटी आणखी वाढणार आहे.
कसा असेल मार्ग?
मुंबई-हैदराबाद बुलेट ट्रेनची लांबी 709 किलोमीटर राहणार आहे. या मार्गाच्या रूट बाबत बोलायचं झालं तर हा मार्ग मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स, नवी मुंबई, लोणावळा, पुणे, दौंड, अकलूज, पंढरपूर, सोलापूर, कलबुर्गी या मार्गे हैदराबादमध्ये जाणार आहे.
या मार्गावरील बुलेट ट्रेनचा कमाल ताशी वेग 350 किलोमीटर एवढा राहणार आहे. मात्र या मार्गावरील बुलेट ट्रेन चा ऑपरेशनल स्पीड हा २५० किलोमीटर प्रति तास एवढा राहील. या बुलेट ट्रेनमुळे मुंबई ते हैदराबाद हा प्रवास गतिमान होणार आहे. या मार्गावर पुणे हे महत्त्वाचे स्थानक राहणार आहे.
यामुळे पुणेकरांना देखील बुलेट ट्रेनचा लाभ मिळणार आहे. दरम्यान सर्व गोष्टी जर सुरळीत राहिल्यात तर हा मार्ग 2041 पर्यंत सर्वसामान्यांसाठी सुरू होऊ शकतो असे सांगितले जात आहे.