Pune Railway News : सध्या उन्हाळी सुट्ट्या सुरू आहेत. यामुळे अनेक जण आपल्या मूळ गावी परतत आहेत. पुण्याहूनही मोठ्या प्रमाणात नागरिक आपल्या मूळ गावाकडे प्रस्थान करत आहेत. यामुळे रेल्वे गाड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होत असून ही गर्दी नियंत्रणात राहावी यासाठी रेल्वेच्या माध्यमातून काही विशेष एक्सप्रेस ट्रेन सोडल्या जात आहेत.
रेल्वे प्रशासनाने पुणे ते भुवनेश्वर दरम्यान देखील विशेष एक्सप्रेस गाडी चालवण्याचा निर्णय घेतलेला आहे. दरम्यान याच विशेष एक्सप्रेस ट्रेन संदर्भात आता एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भुवनेश्वर येथून पुण्याला येणारी भुवनेश्वर-पुणे सुपर फास्ट ट्रेन ही थेट पुणे रेल्वे स्थानकावर येणार नाही. या गाडीचा प्रवास सोलापूरला संपणार आहे. म्हणजे भुवनेश्वर येथून सुटणारी ही गाडी फक्त सोलापूर पर्यंत धावणार आहे.
ही ट्रेन पुण्याला येणार नसल्यामुळे प्रवाशांना पुढचा प्रवास दुसऱ्या ट्रेनने करावा लागणार असे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. मात्र, यामुळे प्रवाशांचा मोठा खोळंबा होईल आणि त्यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागू शकतो.
रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार या रेल्वे मार्गावरील काही तांत्रिक कामांमुळे ही गाडी शॉर्ट टर्मिनेट करण्यात आली आहे. या एक्सप्रेस ट्रेनच्या प्रवासात हा बदल झाला असल्याने प्रवाशांनी प्रवास करताना या बदलाचा विचार करावा असे आवाहन करण्यात आले आहे.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की येत्या तीन दिवसांनी अर्थातच 20 मे ला भुवनेश्वर येथून पहाटे साडेचार वाजता गाडी क्रमांक ०१४५२ ही भुवनेश्वर-पुणे सुपर फास्ट उन्हाळी विशेष गाडी सोडली जाणार आहे.
पण, ही ट्रेन पुण्याएवजी सोलापूरलाच थांबणार आहे. ही गाडी पुण्याला येणार नाही. या गाडीला खुर्दा रोड, ब्रह्मपूर, विजयनगरम जंक्शन, दुवाडा, विजयवाडा, गुंटूर जंक्शन, नलगोंडा, सिकंदराबाद, वाडी आणि कलबुर्गी असे थांबे मंजूर आहेत.
ही गाडी सोलापूर पर्यंतच धावणार असल्याने येथून पुढे प्रवास करण्यासाठी प्रवाशांना दुसऱ्या ट्रेनने जावे लागणार आहे. यामुळे प्रवाशांनी या बदलानुसार प्रवास करावा असे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.