पुणे रिंगरोड बाधित शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी करोडो रुपयांची भेट ! ‘त्या’ गावातील बाधित जमीनधारकांना हेक्टरी 6 कोटी 11 लाखाचा मोबदला, गावनिहाय जमिनीचे दर ?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Pune Ring Road : पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन्ही शहरांसाठी पुणे रिंग रोड हा एक महत्त्वाचा प्रकल्प आहे. हा बाह्य वळण रस्ता शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी रामबाण ठरणार आहे. हा प्रकल्प फक्त शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठीच फायदेशीर ठरेल असे नाही तर यामुळे पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेला देखील गती मिळणार आहे.

हा प्रकल्प फक्त पुण्यासाठीच महत्त्वाचा आहे असे नाही तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी या प्रकल्पाचे एक वेगळे महत्त्व राहणार आहे. हेच कारण आहे की हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी वर्तमान शिंदे फडणवीस पवार सरकार आग्रही आहे. सध्या स्थितीला या प्रकल्पाच्या भूसंपादनाचे काम प्रगतीपथावर आहे. प्रकल्पासाठीचे जमिनीचे मूल्यांकन या आधीच पूर्ण झाले आहे.

सध्या गाव निहाय सुनावणी घेऊन या प्रकल्पासाठी जमिनीचे संपादन पूर्ण केले जात आहे. विशेष म्हणजे जमिनी संपादनाचे हे काम यावर्षी अखेरपर्यंत पूर्ण होणार आहे. यामुळे या मार्गाचे प्रत्यक्षात काम पुढील वर्षाच्या अगदी सुरुवातीला सुरू होऊ शकते असा आशावाद व्यक्त होत आहे.

खरंतर हा 172 किलोमीटर लांबीचा आणि 110 मीटर रुंदीचा रिंग रोड प्रकल्प पूर्व आणि पश्चिम अशा दोन भागात विभागण्यात आला आहे. यामध्ये पूर्व भागात मावळमधील 11, खेडमधील 12, हवेलीतील 15, पुरंदरमधील 5 आणि भोरमधील 3 गावांचा समावेश करण्यात आला आहे. तसेच पश्चिम भागात भोरमधील 5, हवेलीतील 11, मुळशीतील 15 आणि मावळमधील 6 गावांचा समावेश करण्यात आला आहे.

या संपूर्ण रिंग रोड प्रकल्पासाठी एकूण 695 हेक्टर जमीन संपादित करावी लागणार आहे. दरम्यान या प्रकल्पासाठी बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांना रेडी रेकनरच्या पाचपट अधिक मोबदला दिला जात आहे. अशातच आता या भूसंपादनाबाबत एक महत्त्वाची अपडेट हाती आली आहे. ती म्हणजे या प्रकल्पासाठी तालुका निहाय जमिनीचे दर निश्चित करण्यात आले आहे.

खेड तालुक्यातील बाधित शेतकऱ्यांसाठी देखील जमिनीचे दर अंतिम झाले आहेत. तालुक्यातील सर्व बारा गावांसाठी जमिनीचे दर अंतिम करण्यात आले असून यामध्ये सर्वाधिक दर चिंबळी गावासाठी निश्चित झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार या गावातील बाधित शेतकऱ्यांना हेक्टरी 6 कोटी 11 लाख रुपयांचा मोबदला मिळणार आहे.

परंतु, जे शेतकरी संमतीने जमीनी देतील त्यांनाच अधिकचा मोबदला मिळणार आहे. यामुळे दिवाळी सणाच्या अगोदरच पुणे रिंग रोड बाधित शेतकऱ्यांची दिवाळी होणार असल्याचे चित्र आहे. निश्चितच पुणे रिंग रोडसाठी मिळालेला हा दर संबंधित बाधित शेतकऱ्यांसाठी मोठा फायदेशीर राहणार आहे.

कोणत्या गावातील शेतकऱ्यांना किती मोबदला ?

पूर्व भागातील खेड तालुक्याच्या खालुंबे, निघोज, माई, कुरुळी, चिंबळी, केळगाव, चर्‍होली खुर्द, धानोरा, मरकळ, सोळू, गोलेगाव या बारा गावांमधील जमिनीचे दर अंतिम करण्यात आले आहेत. यामध्ये सर्वाधिक दर चिंबळी गावातील शेतकऱ्यांना मिळाला आहे. तसेच खालुंबे गावातील बाधितांना 4 कोटी 34 लाख, चर्‍होली गावातील बाधिताना 4 कोटी 90 लाख रुपये असा मोबदला दिला जाणार आहे.

Leave a Comment