आता राज्यातील शेतकऱ्यांना 7 दिवसात मिळणार माती परीक्षणाचा अहवाल ! कशी असेल प्रक्रिया ? कृषिमंत्री मुंडे यांची मोठी माहिती

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Soil Testing Maharashtra : जर तुम्हीही शेतकरी असाल किंवा शेतकरी कुटुंबातील असाल तर तुमच्यासाठी एक अतिशय मोठी बातमी समोर येत आहे. ती म्हणजे आता राज्यातील शेतकऱ्यांना फक्त सात दिवसात माती परीक्षणाचा अहवाल मिळणार आहे.

विशेष म्हणजे हा अहवाल राज्यातील शेतकऱ्यांना आता मोबाईलवर मिळणार आहे. मोबाईलवर माती परीक्षणाचा अहवाल एसएमएस केला जाणार आहे. खरंतर गेल्या काही वर्षांपासून रासायनिक खतांचा अंदाधुंद वापर वाढला आहे. त्याचा परिणाम म्हणून शेतजमिनीची सुपीकता कमी होत चालली आहे.

यामुळे शेती पिकांचे उत्पादन देखील दिवसेंदिवस कमी होत आहे. अशा परिस्थितीत शेत जमिनीचे आरोग्य सुधारण्यासाठी सेंद्रिय शेतीला चालना देणे हेतू शासनाकडून प्रयत्न केले जात आहेत. याव्यतिरिक्त रासायनिक खतांचा वापर संतुलित प्रमाणात व्हावा यासाठी शासनाकडून प्रयत्न केले जात आहेत.

अशातच आता महाराष्ट्र राज्य शासनाने माती परीक्षणावर भर देण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत महाराष्ट्र राज्य शासनाच्या कृषी मंत्र्यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितल्याप्रमाणे, आता माती परीक्षणासाठी पोस्ट ऑफिसची मदत घेतली जाणार आहे.

तालुका स्तरापर्यंत माती परीक्षण केंद्रे अद्ययावत केले जाणार आहेत. तसेच माती परीक्षणासाठी आता शेतकरी आपल्या मातीचा नमुना माती परीक्षण केंद्राचा पत्ता टाकून त्यावर त्याच्या मोबाईल नंबरसह इतर सर्व सविस्तर माहिती देतील. त्यानंतर मग तालुकास्तरावरील माती परीक्षण केंद्रावर मातीचे परीक्षण होईल.

विशेष म्हणजे ही सर्व प्रक्रिया अवघ्या सात दिवसांच्या आत पूर्ण केली जाणार आहे. तसेच माती परीक्षण पूर्ण झाल्यानंतर याबाबतचा सविस्तर असा अहवाल शेतकऱ्याच्या मोबाईल नंबर वर एसएमएस केला जाईल. खरतर राज्यातील शेतीचे आरोग्य खताच्या नको त्या मात्रामुळे खराब झाले आहे.

यामुळे नापिक होत चाललेली जमीन पुन्हा सुपीक बनवण्यासाठी कर्बचे प्रमाण वाढविले जाणार आहे यासाठी आता कृषी विभाग माती परीक्षणावर भर देणार आहे. निश्चितच कृषी विभागाचा हा निर्णय राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासादायक राहणार आहे. त्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात माती परीक्षण करून खतांचा वापर करतील असा आशावाद व्यक्त होत आहे.

Leave a Comment