पुण्यातील नागरिकांना मध्य रेल्वेची मोठी भेट ! सुरू होणार नवीन रेल्वे गाडी, कसा असेल रूट, वेळापत्रक, कोणत्या स्थानकावर थांबणार? वाचा…..

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Pune Railway News : पुण्यात वास्तव्यास असलेल्या नागरिकांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर येत आहे. ती म्हणजे पुणे शहराला लवकरच एका नवीन रेल्वे गाडीची भेट मिळणार आहे. पुणे ही महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आहे आणि याला शिक्षणाचे माहेरघर म्हणून देखील ओळखतात.

विशेष म्हणजे या शहरात स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात विद्यार्थी येतात. अलीकडे या शहरात वेगवेगळ्या आयटी कंपन्यांनी देखील आपले बस्तान बसवले आहे. यामुळे शिक्षणासाठी, कामानिमित्त आणि पर्यटनासाठी दररोज पुण्यात येणाऱ्यांची संख्या खूपच उल्लेखनीय आहे. यामध्ये मराठवाड्यातून देखील मोठ्या प्रमाणात नागरिक पुण्यात ये-जा करतात.

मराठवाड्यातील बहुतांशी नागरिक पुण्यात स्थायिक झाले आहे. विशेषता लातूर, धाराशिवमधील नागरिक मोठ्या प्रमाणात स्थायिक झाले आहेत. यामुळे लातूरसह संपूर्ण मराठवाड्यातून पुण्यात ये-जा करणाऱ्यांची संख्या खूपच उल्लेखनीय आहे. दरम्यान पुणे ते लातूर दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक अतिशय महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

मध्य रेल्वे विभागाने प्रवाशांची अतिरिक्त गर्दी पाहता पुणे ते लातूर दरम्यान एक नवीन रेल्वे गाडी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. पुणे ते हरंगुळ दरम्यान ही गाडी सुरू होणार आहे. वास्तविक पुणे ते लातूर दरम्यान इंटरसिटी एक्सप्रेस सुरू व्हावी अशी मागणी गेल्या अनेक दिवसांपासून केली जात होती.

या मार्गावर नेहमीच रेल्वे प्रवाशांचे तोबा गर्दी असते यामुळे लातूर ते पुणे दरम्यान इंटरसिटी एक्सप्रेस सुरू झालीच पाहिजे अशी मागणी वेळोवेळी केली जात होती. यामुळे मध्य रेल्वेने प्रवाशांच्या या मागणीच्या पार्श्वभूमीवर पुणे ते लातूर येथील हरंगुळ दरम्यान नवीन एक्सप्रेस गाडी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

केव्हा धावणार ही गाडी ?

ही गाडी 10 ऑक्टोबर 2023 पासून धावणार आहे. पण ठिकाणी मर्यादित कालावधीसाठी सुरू करण्यात आली आहे. ही गाडी फक्त 31 डिसेंबर 2023 पर्यंत सुरू राहणार आहे. परंतु काही मीडिया रिपोर्ट्स मध्ये 10 ऑक्टोबर ते 31 डिसेंबर दरम्यान सुरू करण्यात आलेल्या या गाडीला जर रेल्वे प्रवाशांनी चांगला प्रतिसाद दाखवला तर ही गाडी पुढे नियमित केली जाऊ शकते असा दावा केला जात आहे. यामुळे आता या गाडीला मराठवाड्यातील रेल्वे प्रवाशांच्या माध्यमातून कसा प्रतिसाद दाखवला जातो याकडे लक्ष लागून राहणार आहे.

कसं असेल वेळापत्रक ?

मध्य रेल्वेचे अधिकाऱ्यांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, ही गाडी पुणे रेल्वे स्थानकावरून सकाळी सहा वाजून दहा मिनिटांनी सुटेल आणि दुपारी बारा वाजून पन्नास मिनिटांनी हरंगुळ रेल्वे स्थानकावर पोहोचेल. परतीच्या प्रवासाचा विचार केला तर हरंगुळ येथून ही गाडी दुपारी तीन वाजता सुटेल आणि रात्री नऊ वाजता पुणे रेल्वे स्थानकावर पोहोचेल.

कुठं असतील थांबे ?

मिळालेल्या माहितीनुसार ही गाडी या मार्गावरील सर्वच महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबवण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. हडपसर, उरळी, केडगाव, दौंड, जेऊर, कुरूडवाडी, बार्शी टाउन आणि धाराशिव या महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर या गाडीला थांबा दिला जाणार आहे.

Leave a Comment