महाराष्ट्रातील ‘या’ नागरिकांना मिळणार दीड हजार कोटींचे अनुदान ! राज्य शासनाने दिली मान्यता

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra Government Scheme : राज्य शासनाच्या माध्यमातून देशातील विविध नागरिकांसाठी वेगवेगळ्या योजना चालवल्या जात आहेत. राज्यातील महिला, विद्यार्थी, शेतकरी, कष्टकरी शेतमजूर, असंघटित कामगार ज्येष्ठ नागरिक दिव्यांग यांसाठी विविध योजना महाराष्ट्र राज्य शासनाकडून राबवल्या जात आहेत.

यामध्ये निराधार नागरिकांसाठी देखील शासनाकडून काही महत्त्वाच्या योजना राबवल्या जातात. संजय गांधी निराधार योजना आणि श्रावण बाळ योजना या दोन अशाच महत्त्वाच्या पेन्शन योजना आहेत. दरम्यान या योजनेबाबत एक अतिशय महत्त्वाचे आणि मोठे अपडेट समोर आले आहे.

ते म्हणजे या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना आता एका महिन्याभरात अनुदान मिळणार आहे. वास्तविक या योजनेच्या लाभार्थ्यांना आतापर्यंत प्रति महिना 1000 रुपये एवढे अनुदान मिळत होते. पण गेल्या काही दिवसांपूर्वी या योजनेच्या अनुदान रकमेत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

आता या योजनेच्या लाभार्थ्यांना प्रतिमहीना 1500 रुपये एवढे अनुदान दिले जाणार आहे. दरम्यान हा निर्णय घेतल्यानंतर प्रथमच या योजनेसाठीच्या अनुदानाचे वितरण होणार आहे. यासाठी 1500 कोटी रुपयांच्या निधीला राज्य शासनाकडून मान्यता मिळाली आहे. हे अनुदान राज्यातील सर्वच जिल्ह्यांना वितरित करण्यात आले आहे.

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने आता हे अनुदान येत्या महिन्याभरात पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करावे अशी सूचना राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिली आहे. यामुळे ऐन सणासुदीच्या दिवसांमध्ये राज्यातील निराधारांना मोठा आधार मिळणार असल्याचा आशावाद व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार संजय गांधी निराधार योजनेसाठी 586 कोटी आणि श्रावण बाळ योजनेसाठी 940 कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. यामुळे निराधार नागरिकांचा आगामी नवरात्र उत्सव आणि विजयादशमीचा सण गोड होणार असल्याचे बोलले जात आहे. 

संजय गांधी निराधार योजनेसाठी कोण आहेत पात्र 

संजय गांधी निराधार योजना ही निराधार लोकांसाठी सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत किमान १८ ते ६५ वर्षांखालील निराधार पुरुष व महिला, अनाथ मुले, दिव्यांगांतील सर्व प्रवर्ग, क्षयरोग, कर्करोग, एड्स, कुष्ठरोग यांसारख्या आजारांमुळे स्वतःचा चरितार्थ चालवू न शकणारे पुरुष व महिला, निराधार विधवा, घटस्फोट प्रक्रियेतील व घटस्फोट झालेल्या; परंतु पोटगी न मिळालेल्या, अत्याचारित व देहविक्री व्यवसायातून मुक्त केलेल्या महिला, तृतीयपंथी, देवदासी ३५ वर्षांवरील अविवाहित महिला, तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांची पत्नी, सिकलसेलग्रस्त अशा लोकांना प्रति महिना 1500 रुपये एवढे अनुदान दिले जात आहे.

श्रावण बाळ योजनेसाठी कोण आहेत पात्र?

श्रावणबाळ योजनेअंतर्गत दारिद्र्यरेषेखालील यादीच्या कुटुंबात नाव असलेल्या व २१ हजार रुपयांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेल्या ६५ व ६५ वर्षांवरील नागरिक पात्र असतात. आता या योजनेच्या लाभार्थीस दरमहा १५०० रुपये अर्थसाहाय्य देण्यात येणार आहे.  

Leave a Comment