एका महिन्यानंतर कशी असेल सोयाबीन बाजाराची स्थिती ? दरात वाढ होणार की नाही ? पहा….

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Soybean Market 2023 : सोयाबीन हे महाराष्ट्रातील विदर्भ, मराठवाडा, खानदेश आणि पश्चिम महाराष्ट्रातील बहुतांशी जिल्ह्यात उत्पादित होणारे एक मुख्य पीक आहे. या पिकाची खानदेश मधील जळगाव जिल्ह्यातील देखील मोठ्या प्रमाणात लागवड होते. खरंतर हे एक शाश्वत उत्पादन आणि उत्पन्न देणारे पीक आहे.

यामुळे या पिकाला नगदी पिकाचा दर्जा प्राप्त आहे. मात्र गेल्या एका वर्षापासून सोयाबीनचे बाजार भाव दबावत असल्याने सोयाबीन उत्पादक शेतकरी संकटात आले आहेत. सन 2021 मध्ये सोयाबीनला चांगला विक्रमी भाव मिळाला होता. यामुळे 2022 मध्ये देखील चांगल्या भावाची अपेक्षा होती.

पण गेल्या वर्षापासून सोयाबीनचे दर चांगले दबावत आहेत. 2021 च्या हंगामात सोयाबीनला तब्बल नऊ हजार रुपये ते 11 हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंतचा दर जळगाव जिल्ह्यात मिळत होता. मात्र 2022 जळगाव सह संपूर्ण महाराष्ट्रात सोयाबीनचे बाजार भाव 5 हजारापर्यंत खाली आलेत.

यानंतर सोयाबीनचे भाव वाढलेच नाहीत. यामुळे हे पीक शेतकऱ्यांसाठी डोईजड ठरले आहे. सध्या स्थितीला बाजारात 2023 मधील खरीप हंगामातील नवीन सोयाबीन विक्रीसाठी येऊ लागले आहे. ज्या शेतकऱ्यांनी लवकर पेरणी केली होती त्या शेतकऱ्यांचे हार्वेस्टिंग पूर्ण झाले आहे.

तसेच नवीन माल बाजारात येऊ लागला आहे. मात्र नवीन मालात आद्रता अधिक असल्याचे कारण पुढे करत सोयाबीनला मात्र चार हजार रुपये प्रतिक्विंटल ते साडे चार हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंतचा बाजारभाव दिला जात आहे. वास्तविक केंद्र शासनाने सोयाबीनला 4,600 रुपये प्रति क्विंटल एवढा हमीभाव निश्चित केला आहे.

अर्थातच यावर्षी एम एस पी मध्ये वाढ झाली आहे. निश्चितच शेतकऱ्यांसाठी केंद्र शासनाने घेतलेला हा निर्णय दिलासादायक आहे मात्र सध्या स्थितीला राज्यातील बहुतांशी बाजारात नवीन मालाला हमीभावापेक्षा कमी भाव मिळत आहे. यामुळे राज्यातील शेतकरी संकटात आहेत.

अशातच मात्र शेतकऱ्यांसाठी थोडीशी दिलासदायक अशी बातमी समोर येत आहे. ती म्हणजे येत्या महिन्याभरात अर्थातच विजयादशमी सणानंतर दरात वाढ होण्याची शक्यता आहे. खरंतर यावर्षी देशातील बहुतांशी सोयाबीन उत्पादक भागांमध्ये कमी पाऊस झाला आहे. याचा परिणाम म्हणून उत्पादनात घट येण्याची शक्यता आहे.

उत्पादन घटणार असल्याने आणि भविष्यात सणासुदीचा हंगाम पाहता सोयाबीनची मागणी वधारणाऱ असल्याने विजयादशमीनंतर सोयाबीन बाजारभावात वाढ होऊ शकतो असा अंदाज तज्ञ लोकांच्या माध्यमातून वर्तवला जात आहे. खरंतर उत्पादन फक्त भारतातच कमी होईल असे नाही तर विदेशातही उत्पादन घटणार आहे.

अमेरिका, ब्राझील, चीन यांसारख्या प्रमुख सोयाबीन उत्पादक राष्ट्रांमध्ये जास्तीच्या उष्णतेमुळे पीक अक्षरशः जळण्याच्या मार्गावर आले होते. यामुळे या भागात देखील मोठ्या प्रमाणात उत्पादन घटणार आहे.

याचा परिणाम म्हणून जागतिक पातळीवर उत्पादनात घट येईल आणि सहाजिकच दरात वाढ होईल असा अंदाज आहे. परंतु दरात किती वाढ होते हे पाहण्यासारखे राहणार आहे. कारण की गेल्या हंगामात सोयाबीन मात्र पाच ते सहा हजार रुपये प्रति क्विंटलवर विकला गेला आहे.

Leave a Comment