पुणे रिंगरोड : ‘या’ गावातील फेरमूल्यांकन पूर्ण, अंतिम दर निश्चित; किती गावात फेरमूल्यांकन झाले? प्रकल्पाची सद्यस्थिती काय ?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Pune Ring Road : पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक व्यवस्था बळकट करण्यासाठी तसेच शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने एक महत्वाकांशी प्रकल्प हाती घेतला आहे. हा प्रकल्प आहे पुणे रिंग रोडचा. हा प्रकल्प केवळ पुणे शहरासाठीच नाही तर पुणे ग्रामीणसाठी देखील प्रति महत्त्वाचा आहे.

यामुळे पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील वाहतूक व्यवस्था देखील बळकट होणार असून जिल्ह्यातील कृषी क्षेत्राला आणि पर्यटनाला वाव मिळणार आहे. खरतर हा एक प्रवेश नियंत्रित महामार्ग राहणार आहे परंतु या मार्गामुळे जिल्ह्यातील वाहतूक व्यवस्था मजबूत होणार आहे.

साहजिकच, वाहतूक व्यवस्था मजबूत झाली, पुणे आणि पिंपरी चिंचवड मधील वाहतूक कोंडी फुटली तर याचा डायरेक्ट आणि इनडायरेक्ट फायदा हा जिल्ह्यातील कृषी क्षेत्राला आणि पर्यटनाला भेटणार आहे. दरम्यान राज्य रस्ते विकास महामंडळाने हाती घेतलेल्या या प्रकल्पासाठी फेरमूल्यांकनाचे काम सुरू आहे.

यानुसार पश्चिम भागातील म्हणजेच पश्चिम रिंग रोडच्या 32 गावांचे फेरमूल्यांकनाचे काम पूर्ण झाले आहे. तर पूर्व रिंग रोड मधील चार गावांचे फेर मूल्यांकनाचे काम पूर्ण झाले आहे. फेरमूल्यांकन झाल्यानंतर या गावातील अंतिम दर निश्चित करण्यात आले आहेत.

यानुसार 2,581 बाधित शेतकऱ्यांना नोटीस बजावल्या जात आहेत. 31 जुलैपर्यंत नोटीस बजावून गावपातळीवर शिबिरांचे आयोजन करून संमतीपत्र घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अर्थातच पुणे रिंग रोडला गती मिळाली आहे. लवकरच याचे भूसंपादनाचे काम पूर्ण होणार असे चित्र तयार होत आहे.

कोणत्या गावात झाले फेर मूल्यांकन?

एका मीडिया रिपोर्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार, पश्चिम रिंग रोड मधील मावळ, मुळशी, भोर आणि हवेली तालुक्यातील 32 गावांतील 697 हेक्टर क्षेत्रातील फेरमूल्यांकनाचे काम पूर्ण झाले आहे. यानुसार पश्चिम भागात 2404 स्थानिक बाधित होणार असून यांना नोटीस पाठवली जाणार आहे.

तसेच पूर्वेकडील भोर तालुक्यातील चार गावांतील 105 हेक्टर क्षेत्रातील फेर मूल्यांकनाचे काम पूर्ण झाले असून अंतिम दर ठरवण्यात आले आहेत. यानुसार 177 स्थानिक बाधित होत असून या स्थानिकांना, शेतकऱ्यांना नोटीस बजावण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे.

किती गावातील फेरमूल्यांकन बाकी आहे?

पूर्व रिंगरोड मध्ये मावळ तालुक्यातून 11, खेड 12, हवेली 15, पुरंदरमधील पाच आणि भोरमधील तीन गावांचा समावेश आहे. यापैकी चार गावातील फेरमूल्यांकनाचे काम पूर्ण झाले आहे तर उर्वरित म्हणजे जवळपास 42 गावात फेर मूल्यांकनाची प्रक्रिया बाकी आहे.

तसेच पश्चिम रिंगरोडमध्ये भोर तालुक्यातील पाच, हवेली 11, मुळशी 15 आणि मावळ तालुक्यातील सहा गावांचा समावेश होतो. यापैकी जवळपास 32 गावांचे फेरमुल्यांकनाचे काम पूर्ण झाले आहेत तर पाच गावांचे फेरमुल्यांकन बाकी आहे.

Leave a Comment