पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी ! ‘या’ भागातील वाहतूकित झाला मोठा बदल, पर्यायी मार्ग कोणते? वाचा…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Pune Traffic News : पुणे शहरात सध्या विविध रस्ते विकासाची कामे हाती घेण्यात आली आहेत. शहरातील नागरिकांना वाहतूक कोंडीतून मुक्तता मिळवून देण्यासाठी विविध प्रकल्पांची कामे सुरू असून काही प्रकल्पांची कामे सध्या प्राथमिक स्तरावर आहेत.

दरम्यान काही रस्ते विकासाची कामे ही अंतिम टप्प्यात आली आहेत. या रस्ते विकासाच्या कामामुळे मात्र पुणे शहरात सध्या वाहतूक कोंडी देखील मोठ्या प्रमाणात होत आहेत. अशातच पुणेकरांसाठी वाहतुकीबाबतच एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे.

ती म्हणजे शहरात काही भागातील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, चांदणी चौक परिसरातील कामांमुळे मुंबई-बेंगलोरु महामार्गावरून जाणाऱ्या या भागातील वाहतुकीला पर्यायी मार्गाने वळवण्यात आले आहे.

खरतर ही वाहतूक 15 जुलै पर्यंत वळवण्यात आली होती मात्र चांदणी चौक पुलाचे गर्डर टाकण्याचे काम नियोजित वेळेत झाले नसल्याने आता 21 जुलै पर्यंत वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. यामुळे पुणेकरांना आणखी काही दिवस अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

याबाबत वाहतूक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, 15 जुलै ते 21 जुलै दरम्यान रात्री साडे बारा वाजेपासून ते सकाळी 03:30 वाजेपर्यंत वाहतूक वळवण्यात येणार आहे. दरम्यान आज आपण वाहतुकीत बदल झाला असल्याने या भागात प्रवास करण्यासाठी पर्यायी मार्ग कोणते राहणार आहेत ? याबाबत सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

वाहतुकीत काय बदल राहणार ?

मिळालेल्या माहितीनुसार या कालावधीमध्ये मुंबईकडून येणारी अवजड वाहने मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील तळोजा टोल प्लाझा आणि जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील सोमाटणे टोल प्लाझा येथे थांबणार आहेत.

तसेच मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग आणि जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरून येणारी हलकी वाहने भुजबळ चौक-राजीव गांधी ब्रिज रोड, आणि चांदणी चौक दिवा हॉटेल मार्गे कात्रजला जाऊ शकणार आहेत.

तसेच मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग आणि जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील वाहतूक व्यवस्थापनासाठी अवजड वाहनांना भुजबळ चौक-किवळे पूल आणि राया चौक दरम्यानचा राजीव गांधी पूल रस्ता वापरण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

Leave a Comment