Pune Weather Department : सध्या महाराष्ट्रातून पाऊस गायब झाला आहे. यामुळे बळीराजाच्या नजरा आभाळाकडे आहेत. विशेष असे की ऑगस्ट महिन्यात दरवर्षी राज्यातील प्रमुख धरणे शंभर टक्के क्षमतेने भरून जातात. यंदा मात्र संपूर्ण ऑगस्ट महिना उलटला आहे.
येत्या दोन दिवसात ऑगस्ट महिन्याचा सेंड ऑफ होणार आहे. पण तरीही राज्यातील बहुतांशी धरणे रिकामीच आहेत. रिकामी असलेली धरणे, विहिरीच्या पाणी पातळीत झालेली घट, कोरड्या नद्या या सर्व पार्श्वभूमीवर राज्यातील बहुतांशी भागात दुष्काळ सदृश्य परिस्थिती बघायला मिळत आहे.
परिणामी जर उर्वरित मान्सून काळात चांगला पाऊस पडला नाही तर आगामी काही महिन्यात महाराष्ट्रावर पाणी संकट उभे राहणार आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न देखील ऐरणीवर येण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांसहित सामान्य माणसाचा देखील काळजाचा ठोका चुकला आहे आणि संपूर्ण महाराष्ट्राची नजर आता पावसावर आहे.
जोरदार पाऊस केव्हा पडतो? याचीच सध्या चर्चा पाहायला मिळत आहे. दरम्यान अभूतपूर्व अशा पाणी संकटात सापडलेल्या महाराष्ट्रासाठी एक महत्वाची बातमी समोर येत आहे. पुणे वेधशाळेने पावसाबाबतचा आपला नवीन हवामान अंदाज व्यक्त केला आहे.
पुणे वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात आगामी पाच दिवस हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. याचाच अर्थ ऑगस्ट महिन्याची सुरुवातीला ज्या पावसाने महाराष्ट्राकडे पाठ फिरवली होती तो पाऊस आता सप्टेंबर महिन्यात पुनरागमन करण्याच्या मूडमध्ये आला आहे. यामुळे राज्यातील जनतेला मोठा दिलासा मिळणार आहे, पण जोरदार पाऊस झाला तरच या पावसाचा फायदा होईल असे सांगितले जात आहे आहे.
Pune Weather Department नुसार सप्टेंबर महिन्याची सुरुवात पावसाने होणार असून 29 ऑगस्ट ते 3 सप्टेंबर दरम्यान राज्यातील काही भागात मध्यम ते हलका स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. आता आपण पुणे वेधशाळेने राज्यातील कोणत्या भागात पाऊस पडणार याबाबत काही माहिती दिली आहे याविषयी जाणून घेणार आहोत.
कोणत्या भागात पडणार पाऊस?
वेधशाळेने दिलेल्या बहुमूल्य माहितीनुसार, पुणे शहर तसेच जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्रात पुढील चार दिवस म्हणजेच 29 ऑगस्ट ते दोन सप्टेंबर दरम्यान पाऊस होणार आहे. या कालावधीत मराठवाडा तसेच उत्तर महाराष्ट्रात देखील पावसाचा अंदाज आहे.
खरंतर मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात जुलै महिन्यात देखील चांगला पाऊस पडलेला नव्हता यामुळे त्या भागात पावसाची नितांत गरज आहे. अरबी समुद्रातून येणाऱ्या वाऱ्यांचा वेग वाढत असल्याने मध्य महाराष्ट्र, कोकण आणि विदर्भात काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे.
पण असे असले तरी एलनीनोची तीव्रता आता वाढत असल्याने सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात देखील राज्यात कमी प्रमाणात पाऊस पडणार असे सांगितले जात आहे. यामुळे आता सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात कस हवामान राहतं यावरच या वर्षाचे भवितव्य अवलंबून राहणार आहे.