Pune Weather Update : गेल्या काही दिवसांपासून कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील दक्षिण भागात अवकाळी पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाला असल्याने सध्या महाराष्ट्रात अवकाळी पावसासाठी पोषक हवामान तयार होत आहे.
या कमी दाब क्षत्रामुळे राज्यातील कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील दक्षिण भागात सध्या अवकाळी पाऊस सुरू आहे. पुण्यात देखील अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. धनतेरस अर्थातच धनत्रयोदशीच्या दिवशी पुण्यात पावसाची हजेरी लागली.
काल पुणे शहरातील विविध भागांमध्ये वरूणराजाने दस्तक दिली होती. यामुळे पुणेकरांची दिवाळी शॉपिंग प्रभावित झाली. शहरातील नागरिकांची अवकाळी पावसामुळे बऱ्यापैकी तारांबळ उडाली होती. पुणेप्रमाणेच मध्य महाराष्ट्रातील सांगली, सातारा, कोल्हापूर तसेच कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यातही अवकाळी पाऊस बरसला आहे.
विशेष बाब अशी की हवामान खात्याने आणखी काही दिवस राज्यातील कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील दक्षिण भागात ढगाळ हवामानाची आणि किरकोळ स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवली आहे. याशिवाय भारतीय हवामान खात्याने 11 नोव्हेंबर ते 16 नोव्हेंबर दरम्यान पुण्यातील हवामान कस राहणार, पाऊस पडणार का ? याबाबत देखील महत्त्वाची माहिती दिली आहे.
कसं राहणार 11 ते 16 नोव्हेंबर पर्यंत पुण्यातील हवामान
काल अर्थातच १० नोव्हेंबर रोजी पुण्यातील विविध भागांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. काल धनत्रयोदशी निमित्ताने पुण्यात पावसाची हजेरी लागली असल्याने शॉपिंगसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला आहे.
शहरातील अनेक सखल भागांमध्ये पाणी साचले होते. यामुळे सर्वसामान्यांची चांगलीच तारांबळ उडाली होती. दरम्यान आता पुण्यात पुढील काही दिवस विशेषता दिवाळीच्या आठवड्यात कसं हवामान राहणार, अवकाळी पाऊस पुन्हा हजेरी लावणार का हा प्रश्न पुणेकरांच्या माध्यमातून उपस्थित केला जात आहे.
याबाबत भारतीय हवामान खात्याने महत्त्वाची माहिती दिली आहे. आय एम डी ने दिलेल्या माहितीनुसार, 11 नोव्हेंबरला पुण्यात ढगाळ हवामान राहणार आहे तर काही ठिकाणी किरकोळ स्वरूपाचा हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. सकाळी धुके देखील राहणार आहे.
12 नोव्हेंबरला आकाश निरभ्र राहील. पण दुपारी आणि संध्याकाळी अंशता ढगाळ हवामानाची शक्यता आहे. सकाळी धुके राहणार आहे.
१३ नोव्हेंबरला सकाळी धुके पडेल आणि आकाश मुख्यता निरभ्र राहील. तसेच 14 नोव्हेंबर 15 नोव्हेंबर आणि 16 नोव्हेंबरला आकाश मुख्यता निरभ्र राहण्याची शक्यता हवामान खात्याच्या माध्यमातून वर्तवण्यात आली आहे.
एकंदरीत 11 नोव्हेंबर ते 16 नोव्हेंबर दरम्यान पुण्यात काही दिवस हवामान ढगाळ राहील तर काही दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. पण 11 नोव्हेंबरला हलका पाऊस पडेल असा अंदाज आहे. मात्र उर्वरित पाच दिवस पुण्यातील हवामान निरभ्र राहणार असल्याने पुणेकरांना दिवाळीत आता अवकाळी पावसाचा सामना करावा लागणार नाही असा आशावाद व्यक्त होत आहे.