Pune Weather Update : मध्य महाराष्ट्रातील पुणे सहित महाराष्ट्राच्या हवामानात पुन्हा एकदा मोठा बदल होण्याची शक्यता आहे. खरंतर, गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक भागांमध्ये दिवसाचे कमाल तापमान 40 ते 42 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचले असल्याचे पाहायला मिळाले आहे.
यामुळे अंगाची अक्षरशा लाही-लाही होत आहे. वाढत्या तापमानामुळे नागरिक हैराण झाले आहेत. विशेष म्हणजे येत्या काही दिवसात तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता देखील हवामान खात्याच्या माध्यमातून व्यक्त होत आहे.
अशातच वाढत्या तापमानामुळे बेजार झालेल्या राज्यातील नागरिकांना दिलासा मिळणार असे चित्र तयार होत आहे. कारण की, भारतीय हवामान खात्याने उद्यापासून महाराष्ट्रात पुन्हा एकदा अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली आहे.
आय एम डी ने दिलेल्या माहितीनुसार राज्यात 5 एप्रिल पासून ते 8 एप्रिल पर्यंत मध्य महाराष्ट्र कोकण मराठवाडा आणि विदर्भात अवकाळी पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रातील पुण्याबाबत बोलायचं झालं तर पुण्यातही अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
यामुळे उन्हाच्या चटक्याने होरपळणाऱ्या पुणेकरांसहित महाराष्ट्रातील जनतेला दिलासा मिळण्याची शक्यता आहे. पावसामुळे अंगाची होणारी लाहीलाही काही अंशी कमी होणार असे भासत आहे. मात्र, हा वादळी पाऊस शेतकऱ्यांचे नुकसान करू शकतो अशी भीती सुद्धा आहे.
हवामान खात्याने म्हटल्याप्रमाणे पुण्यात 7 एप्रिल आणि 8 एप्रिल ला पावसाची शक्यता आहे. रविवारी आणि सोमवारी पुण्यातील अनेक भागांमध्ये वादळी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
आय एम डी ने दिलेल्या बहुमूल्य माहितीनुसार, पुणे शहर आणि परिसरात पुढील 3 दिवस म्हणजे शनिवारी दुपारपर्यंत आकाश निरभ्र राहून दुपारनंतर आकाश ढगाळ होण्याची शक्यता दाट आहे.
त्यानंतर रविवार आणि सोमवारी आकाश अंशतः ढगाळ राहील अन हलक्या स्वरूपाचा पाऊस सुद्धा पडेल, असा अंदाज हवामान खात्याने यावेळी वर्तवला आहे. निश्चितच या अवकाळी पावसामुळे पुणेकरांना उकाड्यापासून दिलासा मिळणार आहे यात शंकाच नाही.
पण, हा अवकाळी पाऊस शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे देखील नुकसान करू शकतो यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांची चिंता काहीशी वाढलेली आहे. गेल्यावर्षी अन या चालू वर्षाच्या सुरवातीला आधीच शेतकऱ्यांचे नैसर्गिक संकटांमुळे मोठे नुकसान झाले आहे.
अशातच आता पुन्हा एकदा राज्यात वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असल्याने पुन्हा शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होईल अशी भीती आहे. यामुळे भारतीय हवामान खात्याचा अंदाज लक्षात घेऊन जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आपल्या शेती पिकांची आणि पशुधनाची विशेष काळजी घ्यावी असे आवाहन यावेळी जाणकारांच्या माध्यमातून करण्यात आले आहे.