Punjabrao Dakh Latest Update : गेल्या काही वर्षांत राज्यातील शेतकऱ्यांमध्ये पंजाबराव डख यांचे नाव विशेष चर्चेत आले आहे. पंजाबरावांचे हवामान अंदाज राज्यातील कानाकोपऱ्यात वसलेल्या शेतकऱ्यांमध्ये विशेष लोकप्रिय ठरत आहेत. शेतकऱ्यांच्या मते पंजाबरावांचा हवामान अंदाज त्यांच्यासाठी खूपच फायद्याचा ठरत आहे.

त्यांचे हवामान अंदाज हवामान विभागापेक्षा अचूक असल्याचा दावा काही शेतकरी करतात. शेतकरी सांगतात की हवामान विभागाचा अंदाज समजण्यासाठी त्यांना अडचणीचे होते पण डख यांचे हवामान अंदाज त्यांना सहजतेने कळतात. पंजाबरावं त्यांच्या यूट्यूब चैनल वरून तसेच व्हाट्सअपच्या माध्यमातून राज्यातील लाखो शेतकऱ्यांना हवामान अंदाज पुरवतात.

Advertisement

यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांमध्ये कायमच चर्चेत असणारे पंजाबराव डख कोण आहेत ? त्यांचे 2023 मधील हवामान अंदाज तंतोतंत खरे ठरलेत का ? शेतकऱ्यांमध्ये त्यांची लोकप्रियता वाढण्याचे कारण काय ? अशा प्रश्नांची उत्तरे आज आपण जाणून घेणार आहोत.

कोण आहेत पंजाबराव ?

Advertisement

पंजाबराव डख यांचा जन्म परभणी जिल्ह्यातील हुगळी धामणगाव येथे एका शेतकरी कुटुंबात झाला आहे. वाडवडिलांपासून त्यांचे कुटुंब शेती हा व्यवसाय करत आहे. यामुळे हवामानाचा शेतीवर असणारा प्रभाव आणि बदलत्या हवामानामुळे शेतकऱ्यांचे होणारे नुकसान हे त्यांनी जवळून पाहिले आहे. यामुळे त्यांना हवामानाबाबत जाणून घेण्याची अगदी लहानपणापासूनच उत्सुकता होती.

ते आपल्या वडिलांसोबत लहानपणी टीव्हीवर हवामानाचा अंदाज पाहत असत. हवामान खात्याचा अंदाज लहानपणी टीव्हीवर बघत आणि याबाबत ते त्यांच्या वडिलांशी चर्चा करत असत. दरम्यान, त्यांनी देखील हवामान खात्याप्रमाणे हवामानाचे अंदाज सांगण्यास सुरुवात केली.

Advertisement

सुरुवातीला ते त्यांच्या गावातील व आजूबाजूच्या शेतकऱ्यांसाठी हवामानाचे अंदाज देऊ लागलेत. विशेष म्हणजे त्यांचे अंदाज तंतोतंत खरे ठरू लागलेत. यामुळे आजूबाजूच्या पंचक्रोशीत त्यांचे नाव वाऱ्याच्या वेगाने हवामान तज्ञ म्हणून प्रसिद्ध झाले. पाहता पाहता संपूर्ण महाराष्ट्रात पंजाबरावांचं नाव गाजू लागलं.

सध्याच्या घडीला पंजाबराव डख हे एक प्रसिद्ध हवामान तज्ञ म्हणून ओळखले जात आहेत. पंजाब रावांच्या मते ते निसर्गाच्या संकेतावरून तसेच उपग्रहांच्या आधारावर हवामानाचा अंदाज वर्तवतात. उपग्रहांच्या नकाशाचा अभ्यास करून त्यांचे निरीक्षण करून ते त्यांचा हवामान अंदाज शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवतात.

Advertisement

पंजाबरावांचे शिक्षण किती

मिळालेल्या माहितीनुसार, पंजाबरावं डख यांनी बॅचलर ऑफ आर्ट्स म्हणजेच बीएपर्यंतचे शिक्षण घेतले आहे. शिक्षणानंतर काही काळ त्यांनी अंशकालीन शिक्षक म्हणूनही काम केले आहे. त्यांना हवामानाची आवड असल्याने त्यांनी उपग्रहाचा अभ्यास केला आहे. ईटीडी आणि सीटीसी हा कोर्स त्यांनी केला आहे.

Advertisement

सध्या ते शेतकऱ्यांसाठी हवामानाचा अंदाज देतात आणि त्यांच्या घरची दहा एकर शेती देखील करत आहेत. म्हणजेच पंजाब डख शेती सोबतच शेतकऱ्यांसाठी हवामानाचे अंदाज देत आहेत. विशेष म्हणजे हवामानाचे सर्व अंदाज पंजाबराव डख निशुल्क देतात. यासाठी ते कोणाकडूनच पैसे घेत नाहीत.

2023 मधील त्यांचा अंदाज खरा ठरला का ?

Advertisement

2022 मध्ये पंजाबरावांचे हवामान अंदाज खरे ठरले होते. मात्र 2023 मध्ये पंजाब रावांचे हवामान अंदाज तंतोतंत खरे बसले नाहीत. जून महिन्यात त्यांनी मान्सून वेळेतच दाखल होणार असा दावा केला होता. मात्र यंदा माणूस जूनच्या शेवटच्या आठवड्यात महाराष्ट्रात सर्व दूर पोहोचला.

मात्र त्यांनी जूनपेक्षा जुलैमध्ये अधिक पाऊस पडेल असा अंदाज व्यक्त केला होता त्यानुसार जुलै महिन्यात चांगला पाऊस झाला होता. परंतु जुलैंपेक्षा ऑगस्टमध्ये चांगला पाऊस पडेल असे देखील त्यांनी म्हटले होते मात्र ऑगस्ट महिन्यात महाराष्ट्रात कुठेच चांगला पाऊस झाला नाही.

Advertisement

तर सप्टेंबर महिन्यात त्यांनी चांगला पावसाचा अंदाज बांधला होता आणि सप्टेंबर महिन्यात चांगला पाऊस झाला. एकंदरीत पंजाबरावांचे हवामान अंदाज थोडे चुकलेत. पण काही अंदाज हे तंतोतंत खरे देखील ठरलेत. यामुळे त्यांचे अंदाज पूर्णपणे चुकलेत असे म्हणता येणार नाही पण यावर्षी त्यांचे सर्वच अंदाज खरे ठरलेले नाहीत.

ऑक्टोबर महिन्याबाबत काय अंदाज दिलाय

Advertisement

पंजाबरावांनी ऑक्टोबर महिन्यात सुरुवातीला नवरात्र उत्सवाच्या काळात चांगला पाऊस होणार असा अंदाज बांधला होता. मात्र त्यांनी 3 ऑक्टोबर रोजी नवीन हवामान अंदाज वर्तवला आहे. यामध्ये त्यांनी राज्यात 24 ऑक्टोबर पर्यंत कुठेच मुसळधार पाऊस होणार नाही असे सांगितले आहे.

मात्र 25 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर दरम्यान त्यांनी चांगल्या पावसाची शक्यता वर्तवली आहे. विशेष म्हणजे यंदा दिवाळीतही चांगला पाऊस पडणार असा अंदाज त्यांनी यावेळी बांधला आहे. यामुळे आता त्यांचा हा अंदाज खरा ठरतो का हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे.

Advertisement

Santosh Kumar is an accomplished journalist known for his insightful and impactful reporting. With over a decade of experience in the field Kumar's work has been featured in several leading newspapers...

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *