Panjabrao Dakh Havaman Andaj : राज्यात गेल्या तीन चार दिवसांपासून पावसाचा जोर ओसरला आहे. जुलै महिन्यात राज्यात सर्वदूर जोरदार पाऊस झाला आहे. मात्र आता गेल्या तीन ते चार दिवसांपासून पावसाचा जोर कमी होत चालला आहे. राज्यातील अनेक भागात आता पावसाने उघडीप दिली आहे. खरंतर राज्यात जुलै महिन्यात जोरदार पाऊस झाला, काही भागात अतिवृष्टी झाली, यामुळे राज्यातील मराठवाडा, विदर्भ आणि कोकणातील काही भागात पूरस्थिती निर्माण झाली होती.
मात्र आता ही पूरस्थिती निवळत चालली आहे. अशातच ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाबराव डख यांचा एक नवीन हवामान अंदाज समोर आला आहे. पंजाबराव डख यांनी राज्यातील पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि कोकणात आगामी काही दिवस कसं हवामान राहणार ? याबाबत एक महत्त्वाचे अपडेट दिले आहे. आता आपण पंजाबराव डख यांनी पावसाबाबत काय माहिती दिली आहे याबाबत थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
पूर्व विदर्भ : पंजाबरावांनी दिलेल्या माहितीनुसार पूर्व विदर्भात एक ऑगस्ट ते 4 ऑगस्ट दरम्यान पावसाची शक्यता कायम राहणार आहे. या कालावधीत सर्वदूर पाऊस पडणार नाही मात्र भाग बदलत तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.
पश्चिम विदर्भ : पश्चिम विदर्भात देखील चार ऑगस्टपर्यंत पावसाचा अंदाज आहे. मात्र पश्चिम विदर्भातही सर्वदूर पाऊस पडणार नाही, तुरळक ठिकाणी भाग बदलत विखुरलेल्या स्वरूपाचा पावसाचा अंदाज पंजाबराव यांच्या माध्यमातून यावेळी वर्तवण्यात आला आहे.
उत्तर महाराष्ट्र : उत्तर महाराष्ट्र म्हणजेच नाशिक, अहमदनगर, धुळे, नंदुरबार, जळगाव या जिल्ह्यामध्ये पाच ऑगस्टपर्यंत पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या कालावधीत मात्र उत्तर महाराष्ट्रात सर्व दूर पाऊस न पडता भाग बदलत, दिवसातून एक दोन सऱ्या बरसतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
कोकण : कोकणातही पाच ऑगस्टपर्यंत पावसाचा अंदाज आहे. कोकण अर्थातच ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये 5 ऑगस्ट पर्यंत पाऊस पडणार असा अंदाज आहे. मात्र या विभागात देखील सर्वदूर पाऊस न पडता तुरळक ठिकाणी विखुरलेल्या स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे.
या तारखेनंतर पावसाचा जोर विसरणार
पंजाबरावांच्या मते राज्यात पाच ऑगस्टपर्यंत म्हणजेच पुढील तीन दिवस भाग बदलत पाऊस पडणार आहे. या कालावधीत सर्वदूर पाऊस पडणार नाही मात्र तुरळक ठिकाणी विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. पाच ऑगस्टपर्यंत राज्यात भाग बदलत, दिवसांत एक-दोन सऱ्या आणि 15 ते 20 मिनिटाचा पाऊस पडेल असा अंदाज आहे.
मात्र पाच ऑगस्ट नंतर म्हणजेच सहा ऑगस्टपासून राज्यात पावसाचा जोर ओसरणार आहे. बारा ते तेरा ऑगस्टपर्यंत राज्यात पावसाचा जोर ओसरलेलाच राहणार आहे. मात्र 13 ऑगस्ट पासून राज्यात पावसासाठी पोषक हवामान तयार होणार आहे. 13 ऑगस्ट नंतर राज्यात पुन्हा एकदा पावसाला सुरुवात होणार आहे. तसेच 15 ऑगस्ट पासून राज्यात पावसाचा जोर वाढणार असा अंदाज यावेळी पंजाबरावांच्या माध्यमातून वर्तवण्यात आला आहे.