Ration Card News : शासनाच्या माध्यमातून सामान्य जनतेच्या हितासाठी कायमच विविध उपक्रम हाती घेतले जातात. सामान्य जनतेसाठी शासनाने अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. देशात बँकिंग क्षेत्रातही शासनाच्या माध्यमातून सुधारणा केल्या जात आहेत. यासाठी शासनाने विविध निर्णय घेतले आहेत.
सरकारने पोस्टात बँकिंग सेवा उपलब्ध करून दिली आहे. पोस्टानंतर आता रेशन दुकानात देखील बँकिंग सुविधा पुरवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याचाच अर्थ आता रेशन दुकान बँक बनणार आहे. रेशन दुकानात बँकेच्या विविध सुविधा पुरविल्या जाणार आहेत. सरकारने याबाबतचा निर्णय घेतला आहे.
रेशनिंग दुकानाचे उत्पन्न वाढवण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला असून रेशन दुकानात बँकिंग सेवा उपलब्ध करून देण्याची परवानगी देण्यात आली आहे. ज्या ठिकाणी बँकेची किंवा एटीएमची व्यवस्था नाही अशा ठिकाणी रेशनिंग दुकानांच्या माध्यमातून आता नागरिकांना पैसे काढता येणार आहेत.
सहाजिकच या निर्णयामुळे बँकेपासून आणि एटीएम पासून वंचित असलेल्या भागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार यात शंकाच नाही. रेशनिंग दुकान अर्थातच स्वस्त धान्य दुकान आता केवळ धान्य वितरण पुरतेच मर्यादित राहणार नसून या दुकानात आता बँकिंग सुविधा देखील मिळणार आहेत.
यामुळे, बँकिंग सेवेसाठी आता नागरिकांची होणारी हेळसांड थांबणार आहे. प्रामुख्याने ज्या भागात अद्याप बँकिंग सुविधा पोहोचलेली नाही मात्र रेशन दुकान आहे अशा ठिकाणी ही सुविधा विशेष लाभप्रद सिद्ध होणार आहे.
कोणत्या सुविधा मिळणार?
राष्ट्रीयकृत बँका, खाजगी बँका (अनुसूची 2) आणि इंडिया पोस्ट पेमेंट बँक यांच्या सुविधा रेशन दुकानात उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. शासनाच्या निर्णयामुळे रोकड विरहित व्यवहार होतील. देयक भरणा, आरटीजीएस, कर्ज सुविधा इत्यादी सुविधा ओटीपी आणि बायोमेट्रिक प्रणालीच्या माध्यमातून नागरिकांना उपलब्ध होणार आहेत. एकंदरीत सरकारने घेतलेला हा निर्णय सामान्य नागरिकांच्या हितासाठी असून याचा फायदा रेशनिंग दुकानाच्या उत्पन्नात वाढ घडवून आणण्यासाठी होणार आहे.