रेशन कार्डसोबत आधार कार्ड लिंक करण्यासाठी उरलेत फक्त ‘इतके’ दिवस, कसं करणार लिंक? पहा प्रोसेस

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ration Card News : देशभरातील रेशन कार्ड धारकांसाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी समोर येत आहे. जर तुम्हीही रेशन कार्डधारक असाल आणि शासनाच्या स्वस्त दरातील धान्याचा तसेच मोफत धान्याचा लाभ घेत असाल तर आजची ही बातमी तुमच्यासाठीही खास राहणार आहे. खरंतर केंद्र शासनाच्या माध्यमातून देशभरातील गरीब आणि गरजू लोकांसाठी, शिधापत्रिकाधारक लोकांसाठी स्वस्त दरात धान्य उपलब्ध करून दिले जाते.

विशेष म्हणजे कोरोना काळापासून शासनाकडून मोफत धान्य पुरवले जात आहे. तसेच डिसेंबर 2023 पर्यंत शासनाकडून मोफत धान्य पुरवले जाणार आहे. मात्र शासनाच्या या योजनेचा अनेकजण चुकीच्या पद्धतीने लाभ उचलत आहेत. अनेक लाभार्थ्यांचे दोन रेशन कार्ड आहेत. दोन रेशन कार्ड मध्ये नाव असलेले अनेक लाभार्थी आढळून आले आहेत.

यामुळे केंद्र शासनाने या अशा अपात्र लाभार्थ्यांवर लगाम लावण्यासाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यानुसार आता रेशन कार्ड धारक लोकांना आपले रेशनकार्ड आधार कार्डसोबत लिंक करणे आवश्यक आहे. शासनाने शिधापत्रिका धारक लोकांना आपले आधार कार्ड शिधापत्रिका सोबत लिंक करण्यासाठी 30 जून 2023 पर्यंत मुदत दिली होती.

मात्र शासनाने दिलेल्या मुदतीत अनेक लोकांनी लिंकिंग पूर्ण केलेली नाही. परिणामी आता शासनाने या कामासाठी मुदतवाढ दिली आहे. शासनाने आता हे काम पूर्ण करण्यासाठी 30 सप्टेंबर 2023 पर्यंत मुदत दिली आहे. अर्थातच तीन महिन्यांची मुदत वाढ देण्यात आली आहे.

अशा परिस्थितीत आज आपण ज्या लोकांनी रेशनकार्ड आधार कार्डसोबत लिंक केलेले नसेल त्या लोकांसाठी एक अतिशय महत्त्वाची माहिती घेऊन जर चालू आहोत. आज आपण Ration आणि Aadhar Card लिंक कशा पद्धतीने केले जाऊ शकते याविषयी जाणून घेणार आहोत.

ऑनलाईन असं करा लिंक

यासाठी सर्वप्रथम आपणास food.wb.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागणार आहे. यानंतर तिथे विचारलेली सर्व आवश्यक माहिती भरावी लागेल. जसे की, आधार कार्ड क्रमांक, शिधापत्रिका क्रमांक आणि तुमचा नोंदणीकृत मोबाइल नंबर. यानंतर मग ‘continue’ या पर्यायावर क्लिक करावे लागेल.

मग तुम्हाला तुमच्या नोंदणीकृत क्रमांकावर एक OTP पाठवला जाईल. हा OTP तुम्हाला दिलेल्या रकान्यात एंटर करायचा आहे आणि तुमचे रेशन आणि आधार एकमेकांना लिंक होईल. जर आपण कोणत्याही कारणास्तव ऑनलाईन पद्धतीने हे काम करण्यास असमर्थ असाल तर आपण आपल्या रेशन दुकानदाराकडे जाऊन रेशनकार्ड आधार कार्ड सोबत लिंक करू शकता.

Leave a Comment