अहमदनगरकरांनो सावधान ! येत्या 3-4 तासात मुसळधार पाऊस कोसळणार, ‘या’ 9 जिल्ह्यातही पावसाची धुवाधार बॅटिंग होणार, मुंबई हवामान विभागाचा अंदाज

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar Rain : कालपासून राज्यात पावसाचा जोर वाढला आहे. काल राज्यातील मराठवाडा, विदर्भ तसेच उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला आहे. कोकणात आणि मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर गेल्या अनेक दिवसांपासून पाऊस सुरूच आहे. आज कोकणात आणि घाटमाथ्यावर पावसाचा जोर आणखी वाढला आहे.

अशातच मुंबई हवामान विभागाच्या माध्यमातून एक महत्त्वाचे अपडेट समोर येत आहे. आय एम डी मुंबईने दिलेल्या माहितीनुसार, पुढील तीन ते चार तासात महाराष्ट्रातील अहमदनगरसह एकूण 9 जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

विशेष म्हणजे या जिल्ह्यांमध्ये वादळी वारे देखील वाहणार आहेत. वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळणार असा अंदाज असल्याने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे.

कोणत्या जिल्ह्यात पडणार मुसळधार पाऊस

मुंबई हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, येत्या तीन ते चार तासात खानदेश मधील जळगाव आणि धुळे तसेच मध्य महाराष्ट्रातील सोलापूर आणि अहमदनगर याव्यतिरिक्त छत्रपती संभाजी नगर, जालना आणि हिंगोली या जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे.

विशेष म्हणजे या जिल्ह्यात वादळी वारे देखील वाहणार आहेत. याव्यतिरिक्त नाशिक जिल्ह्यातही पुढील तीन ते चार तासात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यासोबतच दक्षिण कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यातही पुढील तीन ते चार तासात पाऊस पडणार असा अंदाज आहे.

यामुळे या संबंधित जिल्ह्यातील नागरिकांनी विशेष सावधानता बाळगणे अपेक्षित आहे. शेतकऱ्यांनी देखील शेतीची कामे करताना काळजी घ्यावी असे आवाहन यावेळी करण्यात आले आहे.

निश्चितच जून महिन्यात पावसाने खंड दिल्यानंतर आता जुलै महिन्यात पुन्हा एकदा पाऊस सक्रिय झाला असल्याने शेतीशिवारात शेतकऱ्यांची लगबग वाढली आहे. शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर पाऊस पुन्हा एकदा सक्रिय झाला असल्याने मोठे समाधान पाहायला मिळत आहे. 

Leave a Comment