Ration Card News : महाराष्ट्र राज्य शासनाच्या माध्यमातून नेहमीच सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी वेगवेगळे निर्णय घेतले जातात. वर्तमान शिंदे-फडणवीस-पवार सरकारने देखील राज्यातील सर्वसामान्यांसाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. विशेष म्हणजे हे चालू वर्षे निवडणुकांचे राहणार आहे. या चालू वर्षात लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत.
शिवाय लोकसभेच्या निवडणुका पार पडल्यात की, लगेचच राज्यात विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजणार आहे. या पार्श्वभूमीवर वर्तमान सरकारच्या माध्यमातून सर्वसामान्यांना खुश करण्यासाठी विशेष प्रयत्न देखील केले जात आहेत.
याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून आज अर्थातच 10 जानेवारी 2024 ला झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.
या बैठकीत एकूण नऊ महत्वाचे निर्णय वर्तमान सरकारने घेतले आहेत. यामध्ये आनंदाचा शिधा योजनेबाबत देखील महत्त्वाचा निर्णय झाला आहे. खरे तर या चालू महिन्यात जगातील तमाम रामभक्तांना एक मोठी भेट मिळणार आहे.
ती म्हणजे अयोध्या येथे सुरू असलेल्या भव्य दिव्य अशा राम मंदिराचे बांधकाम पूर्ण होणार असून या मंदिरात प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. म्हणजे प्रभू श्रीराम अयोध्यातील भव्य-दिव्य राम मंदिरात विराजमान होणार आहेत.
विशेष बाब अशी की, प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न झाल्यानंतर लगेचच हे मंदिर रामभक्तांसाठी खुले होणार आहे. म्हणजे राम भक्तांना आता येत्या काही दिवसात प्रभू श्रीरामांचे मंदिरात दर्शन घेता येणार आहे. 22 जानेवारी 2024 ला हा ऐतिहासिक सोहळा पार पडणार आहे.
हा सोहळा दस्तुरखुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. या सोहळ्याला जगभरातील अनेक प्रतिष्ठित अतिथी हजेरी लावणार आहेत. परिणामी या सोहळ्याकडे संपूर्ण जगाचे लक्ष राहणार आहे.
विशेष म्हणजे या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर आज राज्यातील सरकारने सर्वसामान्यांना एक मोठी भेट देण्याचा निर्णय घेतला आहे. ती म्हणजे श्री राम प्राणप्रतिष्ठा सोहळा आणि छत्रपती शिवाजी महाराज जयंती दिनानिमित्त राज्यातील जनतेला आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय वर्तमान शिंदे सरकारने घेतला आहे.
आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून यामुळे राज्यातील आनंदाचा शिधास पात्र शिधापत्रिका धारकांना मोठा दिलासा मिळेल.
त्यांना श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी चांगले स्वादिष्ट पकवान बनवता येतील, श्रीरामांना चांगला भोग लावता येईल आणि छत्रपती शिवराय जयंती दिनानिमित्त देखील आनंदाचा शिधा मिळणार असल्याने या दिवशी देखील सर्वसामान्यांना छत्रपतींची जयंती जल्लोषात साजरा करता येणार आहे.