Salt Water Light Lamp : भारताला स्वातंत्र्य मिळून आज कंप्लेंट 76 वर्षे दोन महिने आणि तीन दिवस झाले आहेत. म्हणजे पारतंत्र्यांच्या बेड्या तोडून आपण साडेसात दशकाचा स्वातंत्र्याचा काळ अनुभवला आहे. मात्र पारतंत्र्याच्या बेड्या तुटल्या असल्या तरी देखील भारतात अजूनही पायाभूत सुविधा पूर्णपणे विकसित झालेल्या नाहीत.
यामुळे कधी-कधी असे वाटते की आपण अजूनही पारतंत्र्यांतच जगत आहोत. भारतात अजूनही असे काही भाग आहेत जिथे वीज, पाणी आणि रस्ते यांसारख्या पायाभूत सुविधांची पायाभरणी झालेली नाहीये. देशात असे अनेक मागासलेले भाग आहेत जिथे विज पोहोचलेली नाही. यामुळे त्या परिसरातील विकास पूर्णपणे खुंटलेला आहे.
यामुळे नागरिकांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. विजेच्या अभावामुळे मुलांना योग्य शिक्षण मिळत नाहीये. लोकांना आरोग्याच्या सुविधा व्यवस्थित रित्या पोहोचत नाहीयेत. खरंतर भारताची अर्थव्यवस्था ही जगातील पाचव्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनली आहे.
विशेष बाब अशी की येत्या काही वर्षात भारत जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनणार आहे. मात्र अजूनही देशात काही ठिकाणी वीजेंसारखी पायाभूत सुविधा विकसित झालेली नसल्याने भारताच्या एकात्मिक विकासावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. मात्र आता ज्या भागात अद्याप वीज पोहोचलेली नाही त्या भागातील नागरिकांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी समोर येत आहे.
कारण की एका कंपनीने आता कमाल केली आहे. देशातील एका कंपनीने एक खास बल्ब तयार केला आहे. हा बल्ब चक्क पाण्यावर चालणार आहे. यासाठी कोणत्याही चार्जिंगची गरज भासणार आहे. म्हणजे यासाठी इलेक्ट्रिसिटीची गरज भासणार नाहीये. यामुळे ज्या भागात अजून वीज नाही त्या भागातील नागरिकांसाठी हा बल्ब खूपच फायदेशीर ठरणार आहे.
कोलंबियन पॉवर स्टार्ट-अप ई-दिनाने हा बल्ब तयार केला आहे. हा बल्ब खारट पाण्यावर चालणार आहे. हा खाण्यावर चालणारा दिवा ज्या भागात सातत्याने वीज पुरवठा खंडित होतो त्या भागातील नागरिकांसाठी फायदेशीर ठरेल. मिळालेल्या माहितीनुसार हा पाण्यावर चालणारा दिवा समुद्राच्या खारट पाण्यावर चालणार आहे. यासाठी फक्त एक कप समुद्राचे खारट पाणी लागणार आहे.
एक कप समुद्राच्या खारट पाण्यात हा दिवा तब्बल आठ घंटे प्रकाश देत राहील असा दावा केला जात आहे. विशेष बाब अशी की जर समुद्राचे खारट पाणी नसेल तर हा दिवा मानवी लघवीवर देखील चालू शकणार आहे. यामुळे सध्या या तंत्रज्ञानाची संपूर्ण देशभरात चर्चा रंगली आहे.
विशेष म्हणजे सौरदिव्यापेक्षा हे तंत्रज्ञान अधिक फायदेशीर ठरणार आहे. कारण की सूर्यप्रकाश नसला तरी देखील हा दिवा चालवता येणार आहे. यासाठी फक्त समुद्राचे खारट पाणी किंवा मग मानवी लघवीचा वापर करावा लागणार आहे.