एसबीआय आणि एचडीएफसी बँकेच्या ग्राहकांसाठी कामाची बातमी ! बँक खात्यात एवढी रक्कम नसेल तर…..

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

SBI And HDFC Bank : एसबीआय आणि एचडीएफसी बँकेच्या ग्राहकांसाठी मोठी बातमी आहे. एसबीआय ही देशातील पब्लिक सेक्टरमधील आणि एचडीएफसी ही देशातील प्रायव्हेट सेक्टर मधील सर्वात मोठी बँक आहे. दरम्यान जर तुमचेही या बँकेत बचत खाते असेल तर तुम्हाला तुमच्या बचत खात्यात किमान शिल्लक म्हणजेच मिनिमम बॅलन्स ठेवावा लागणार आहे.

प्रत्येक बँक आपल्या ग्राहकांना बचत खात्यात किमान शिल्लक ठेवण्याचा सल्ला देतात. जे ग्राहक खात्यात मिनिमम बॅलन्स ठेवत नाही त्यांच्यावर बँकेच्या माध्यमातून दंडात्मक कारवाई होते. बचत खात्यात किमान शिल्लक रक्कम ठेवली नाही तर बँकेकडून नॉन मेंटेनन्स शुल्क आकारले जाऊ शकते.

प्रत्येक बँक बचत खाते धारकाने जर किमान शिल्लक रक्कम ठेवली नाही तर नॉन मेंटेनन्स शुल्क आकारते. मात्र अनेकांना बँकेत किती किमान शिल्लक रक्कम ठेवली पाहिजे याबाबत बँकेचे काय नियम आहेत याविषयी माहिती नाहीये. नियमांची माहिती नसल्याने anekjnबँक खात्यात मिनिमम बॅलन्स ठेवत नाहीत ही वास्तविकता आहे.

यामुळे मात्र ग्राहकांना मोठा दंड भरावा लागतो. दरम्यान आज आपण एसबीआय किंवा एचडीएफसी बँकेच्या खातेधारकांनी त्यांच्या बचत खात्यात किती किमान शिल्लक रक्कम ठेवली पाहिजे ? याबाबत बँकेचे काय नियम आहेत याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

State Bank Of India : स्टेट बँक ऑफ इंडिया ही सर्वात मोठी सरकारी बँक आहे. या बँकेचे करोडो ग्राहक आहेत. एसबीआय मध्ये अनेकांचे बचत खाते आहे. जर तुमचेही या सरकारी बँकेत खाते असेल तर तुम्ही तुमच्या बचत खात्यात मिनिमम बॅलन्स ठेवायला हवा.

जर तुमचे मेट्रो किंवा शहरी भागातल्या एसबीआयमध्ये बचत खाते उघडलेले असेल तर तुम्हाला एसबीआय बँकेच्या बचत खात्यात किमान तीन हजार रुपये एवढा मिनिमम बॅलन्स मेंटेन करावा लागणार आहे.

तसेच जर तुमची एसबीआय बँक निमशहरी किंवा छोट्या शहरातली असेल तर तुम्हाला तुमच्या बचत खात्यात किमान २,००० रुपये एवढी रक्कम मिनिमम बॅलन्स म्हणून ठेवावी लागणार आहे. त्याचप्रमाणे, जर तुमची बँक ग्रामीण भागातील असेल तर तुम्हाला तुमच्या बँकेच्या बचत खात्यात किमान एक हजार रुपये एवढा मिनिमम बॅलन्स मेंटेन करावा लागणार आहे.

एचडीएफसी बँक : एसबीआय ही देशातील सर्वात मोठी सरकारी बँक आहे आणि एचडीएफसी ही देशातील सर्वात मोठी प्रायव्हेट बँक आहे. एचडीएफसी बँकेने देखील मिनिमम बॅलन्स संदर्भात नियम बनवलेले आहेत.

यानुसार शहरी भागातील ग्राहकांना बचत खात्यात किमान दहा हजार रुपये, निमशहरी भागातील ग्राहकांना बचत खात्यात किमान पाच हजार रुपये आणि अडीच हजार रुपये एवढी किमान शिल्लक रक्कम ठेवावी लागणार आहे.

Leave a Comment