2 लाखाच्या गुंतवणुकीत सुरू करा ‘हा’ बिजनेस ! महिन्याकाठी होणार 75 हजारापर्यंत कमाई, 12 महिने चालणारा व्यवसाय

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Small Business Idea : कोरोना काळापासून अनेक जण नोकरी ऐवजी व्यवसायात उतरत आहेत. देशातील अनेकांना नवीन व्यवसाय सुरू करायचा आहे. तथापि, असे बरेच लोक आहेत जे व्यवसायाला खूपच रिस्की मानतात, परंतु तसे नाही. सर्व जोखीमपुर्ण घटकांची नियोजनबद्ध पद्धतीने गणना करून व्यवसाय सुरू केल्यास बिजनेस मधून देखील चांगली कमाई करता येणार आहे.

किंबहुना अनेक तरुणांनी नवीन स्टार्टअप सुरू करून आणि तो स्टार्टअप यशस्वी करून ही गोष्ट खरी ठरवली आहे. दरम्यान आज आपण अशाच एका बिजनेसची माहिती जाणून घेणार आहोत ज्यातून चांगली कमाई करता येणार आहे. विशेष म्हणजे हा व्यवसाय अवघ्या एक ते दोन लाख रुपयांच्या गुंतवणुकीत सुरू करता येणार आहे. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया या बिजनेसची सविस्तर माहिती 

कोणता आहे तो व्यवसाय?

जर तुम्ही नोकरी करत असाल आणि नोकरी सोबतच अतिरिक्त कमाई साठी व्यवसाय सुरू करायचा असेल किंवा फुल टाइम व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुम्ही डिस्पोजेबल कप, प्लेट्स आणि ग्लासेस चा बिजनेस सुरु करू शकता. अलीकडे बाजारात डिस्पोजेबल कप, प्लेट्स आणि ग्लासेसला मोठी मागणी आली आहे.

विशेष म्हणजे याच्या वापराला प्रोत्साहन मिळावे यासाठी सरकार देखील प्रयत्नशील आहे. प्रदूषण नियंत्रणासाठी डिस्पोजेबल कप, प्लेट्स आणि ग्लासेसच्या वापराला प्रोत्साहन मिळतं आहे. आता लोक देखील खूपच जागरूक झाले आहेत आणि याचा वापर भारतात दिवसागणिक वाढत आहे. यामुळे हा व्यवसाय निश्चितच तुमच्यासाठी फायद्याचा ठरणार आहे.

किती गुंतवणूक करावी लागणार

हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला जागा शोधावी लागणार आहे. जर तुमच्याकडे जागा नसेल तर तुम्ही भाडेतत्त्वावर जागा घेऊन शेड तयार करू शकता आणि या व्यवसायाची सुरुवात करू शकता. किंवा तुम्ही तुमच्या घरात जर जागा असेल तर तुमच्या घरातून देखील हा बिजनेस सुरु करू शकता.

तुम्हाला डिस्पोजेबल कप, प्लेट्स आणि ग्लासेस मॅन्युफॅक्चर करण्यासाठी काही मशीन्स लागणार आहेत. डिस्पोजेबलपासून लहान, कप, प्लेट्स बनवायचे असतील तर अशा परिस्थितीत, तुम्हाला एक लहान मशीन खरेदी करावी लागणार आहे.

जर तुम्हाला मोठे डिस्पोजेबल कप आणि प्लेट्स बनवायचे असतील तर अशा स्थितीत तुम्हाला मोठी मशीन घ्यावी लागेल. लहान मशीन साठी तुम्हाला दोन लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करावी लागू शकते मात्र मोठ्या मशीन साठी तुम्हाला यापेक्षा अधिक गुंतवणूक करावी लागणार आहे.

मशीन खरेदी केल्यानंतर तुम्हाला पेपर रील इत्यादी कच्चा माल खरेदी करावा लागणार आहे. हे सर्व खरेदी केल्यानंतर तुम्हाला याचे उत्पादन सुरू करता येणार आहे. जर तुमच्याकडे या व्यवसायासाठी आवश्यक गुंतवणूकीसाठी पैसे नसतील तर तुम्ही पीएम मुद्रा योजनेअंतर्गत कर्ज घेऊन हा व्यवसाय सुरु करू शकता.

किती कमाई होणार 

कमाईबाबत बोलायचं झालं तर या व्यवसायाकडून महिन्याकाठी सहजतेने 75 हजारापर्यंतची कमाई केली जाऊ शकते. मात्र कमाईचा हा आकडा तुमच्या सेलिंगवर अवलंबून असेल.

जेवढी तुमची विक्री होईल तेवढाच लाभ तुम्हाला यातून मिळू शकणार आहे. त्यामुळे व्यवसाय सुरू केल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम याच्या मार्केटिंग वर विशेष लक्ष केंद्रित करावे लागणार आहे. मार्केटिंग साठी तुम्ही सोशल मीडियाचा वापर अवश्य केला पाहिजे.

Leave a Comment