SBI Home Loan : स्वतःचे एक हक्काचे घर असावे जिथे आपले उर्वरित आयुष्य मनमुरादपणे जगता यावे असे स्वप्न आपल्यापैकी अनेकांनी पाहिलेले असेल. काहींचे हे स्वप्न पूर्ण झाले असेल तर काही लोक अजूनही गृहनिर्मितीसाठी दिवसाची रात्र आणि रात्रीचा दिवस करत असतील.
मात्र अलीकडे घर बनवणे सोपे राहिलेले नाही. घरांसाठी खूप सारा पैसा खर्च करावा लागतो. आयुष्याची सर्व जमापुंजी घर बनवण्यातच निघून जाते.
तसेच काहीजणांना घर बनवण्यासाठी गृह कर्जाचा आधार घ्यावा लागतो. दरम्यान जाणकार लोकांनी गृह कर्ज घेताना विविध बँकांचे व्याजदर तपासण्याचा सल्ला दिला आहे.
म्हणजे जी बँक कमी व्याजदर, कमी प्रोसेसिंग शुल्क आकारात असेल तेथून हे लोन घेतले पाहिजे. खरे तर देशातील अनेक बँका ग्राहकांना पुरवणाऱ्या दरात गृह कर्ज उपलब्ध करून देतात.
यामध्ये एसबीआयचा देखील समावेश होतो. दरम्यान आता आपण एसबीआय बँकेच्या गृह कर्जाची थोडक्यात माहिती करून घेणार आहोत.
एसबीआय होम लोनचे व्याजदर ?
स्टेट बँक ऑफ इंडिया ग्राहकांना सिबिल स्कोरच्या आधारावर कर्ज पुरवते. अर्थातच ज्यांचा सिबिल स्कोर चांगला त्यांना कमी व्याज दरात कर्ज मिळते. मात्र ज्यांचा सिबिल स्कोर थोडा कमी असतो त्यांना अधिकचे व्याजदर द्यावे लागते.
मिळालेल्या माहितीनुसार, चांगला सिबिल स्कोर असलेल्या अर्थातच 750 पेक्षा अधिक सिबिल स्कोर असलेल्या ग्राहकांना बँकेकडून 9.15 ते 9.55% व्याज दरात गृहकर्ज ऑफर केले जात आहे.
मात्र 700 ते 749 दरम्यान सिबिल स्कोर असलेल्या ग्राहकांना 9.35 ते 9.75 टक्के व्याज दरात लोन उपलब्ध होते.
60 लाखांचे कर्ज घेतले तर कितीचा हप्ता
जर स्टेट बँक ऑफ इंडियाकडून एखाद्या ग्राहकाला 9.35 टक्के दराने आणि तीस वर्षांच्या कालावधीसाठी 60 लाख रुपयांचे कर्ज मंजूर झाले तर त्याला दरमहा 49 हजार 796 रुपयांचा हप्ता भरावा लागणार आहे.
या कालावधीत सदर व्यक्ती एक कोटी 79 लाख 26 हजार 533 रुपय बँकेत भरेल. यामध्ये एक कोटी 19 लाख 26 हजार 533 रुपये त्याचे व्याज राहणार आहे.